नवी दिल्ली, जुलै 2025: भारतातील आघाडीची टॉर्च आणि बॅटरी ब्रँड एव्हररेडी इंडस्ट्रीज ने आज देशातील पहिली हायब्रिड टॉर्च सादर केली आहे. दुहेरी उर्जेवर चालणाऱ्या या अद्वितीय टॉर्चच्या माध्यमातून कंपनीने आपल्या टॉर्च उत्पादनांच्या श्रेणीत आणखी विस्तार केला आहे. ही टॉर्च रिचार्जेबल आणि बॅटरीवर चालणाऱ्या दोन्ही प्रकारांत वापरता येते, त्यामुळे विजेच्या अनुपस्थितीतही प्रकाशाची सुविधा कायम राहते – आणि ग्राहक कधीच अंधारात राहात नाहीत.
एव्हररेडीची ही पुढच्या पिढीतील हायब्रिड टॉर्च एक पेटंटसाठी अर्ज केलेले उत्पादन आहे, ज्यामध्ये 1W क्षमतेचा सुपर-ब्राइट फ्रंट LED आहे जो केंद्रित प्रकाश देतो, तसेच 1W साइड लाइटसुद्धा आहे. हे दोन्ही दिवे मजबूत ABS प्लास्टिकच्या शरीरात बसवलेले आहेत, जे दररोजच्या वापरासाठी आणि कठीण बाह्य परिस्थितीत वापरण्यासाठी योग्य आहे. ही अद्वितीय टॉर्च अंगभूत रिचार्जेबल बॅटरीसह येते, जी फास्ट-चार्जिंग USB टाइप-C पोर्टद्वारे केवळ 2.5 तासांत पूर्ण चार्ज होते. यासोबतच ही टॉर्च एकाच वेळी 3 x AA बॅटर्यांवर चालते, त्यामुळे जर टॉर्चची बॅटरी संपली, तर तुम्ही सहज बॅटरी ऑपरेटेड मोडमध्ये स्विच करू शकता. ग्राहक कधीही अंधारात राहू नये, ही मुख्य गरज लक्षात घेऊन ही टॉर्च डिझाइन करण्यात आली आहे. यामध्ये ओव्हरचार्ज संरक्षण आणि डीप डिसचार्ज संरक्षण यांसारखी अतिरिक्त सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत, जी बॅटरीचे आयुष्य वाढवण्यास मदत करतात. याशिवाय, या उत्पादनाच्या खास डिझाइनमध्ये फ्रंट आणि साइड लाइटसाठी स्वतंत्र स्लाइड स्विच, पॉवर मोड (रिचार्जेबल किंवा बॅटरीवर चालणारी) निवडण्यासाठी स्विच, चार्जिंग इंडिकेटर लाइट, या सर्व सुविधांमुळे वापरकर्त्याला अधिक सोयीस्कर अनुभव मिळतो.
लॉन्चप्रसंगी एव्हररेडी इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिर्बन बॅनर्जी म्हणाले, “एव्हररेडीमध्ये प्रत्येक उपक्रमाच्या केंद्रस्थानी नवोपक्रम आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या तत्त्वज्ञानामुळे आम्हाला नेहमीच ग्राहकांना सक्षम करणारी अद्वितीय आणि मार्गदर्शक उत्पादने सादर करता आली आहेत. एव्हररेडीकडून सादर करण्यात आलेले हे नवीन उत्पादन ब्रँडच्या नवीनतेची आणि विश्वासार्हतेची परंपरा दर्शवते. हे ग्राहकांना आधुनिक सोयीसह अखंड प्रकाश देण्याचे काम करते. आमची ही हायब्रिड टॉर्च — नवयुगातील एक नावीन्यपूर्ण उपाय — वापरकर्त्यांना गुणवत्ता, सोय आणि विश्वासार्हता याचे आश्वासन देते, आणि त्यांना कधीही अंधारात राहू देत नाही. पुढील काळातही एव्हररेडी भारतातील घराघरांमध्ये अधिक स्मार्ट, व्यावहारिक आणि विश्वासार्ह उपाय देण्यासाठी कटिबद्ध राहील.”
नवीन हायब्रिड टॉर्चचे अनावरण खास करण्यासाठी, एव्हररेडीने बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांच्या ‘निकिता रॉय’ या चित्रपटासोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीचा एक भाग म्हणून सोनाक्षीचा एक खास व्हिडीओ दाखवला जाणार आहे, ज्यात हायब्रिड टॉर्चची 2-इन-1 पॉवर बॅकअप सुविधा आणि पॉवर मोड झटक्यात बदलता येणारा सोपा स्विच दाखवण्यात येणार आहे. ही टॉर्च दीर्घकाळ प्रकाश देते आणि वापरकर्ते #NeverOutOfLight — म्हणजेच कधीही अंधारात नाही — याची खात्री देते. या चित्रपटात सोनाक्षी निकिता रॉय ही भूमिका साकारते, जिला भयावह अंधारात आणि वैयक्तिक अडचणींमधून मार्ग काढावा लागतो. त्यामुळेच ती या मोहिमेच्या धैर्य आणि प्रकाश या संकल्पनेशी अगदी योग्य जुळणारी निवड आहे.
लिंक : https://www.youtube.com/watch?v=LGYQybtUqW4
“सोनाक्षी सिन्हा यांच्या ‘निकिता रॉय’ या चित्रपटासोबतची आमची भागीदारी ही केवळ उत्पादन प्रमोशनापुरती मर्यादित नाही,” असे श्री. बॅनर्जी म्हणाले. “ती अंधारातही पुढे जाण्याची ताकद आणि खंबीरतेचे प्रतीक आहे.”
दररोजच्या वापरासाठी, प्रवास, कॅम्पिंग, ट्रेकिंग, सुरक्षा आणि आणीबाणीच्या प्रसंगासाठी डिझाइन केलेली ही हायब्रिड टॉर्च दोन उर्जास्त्रोतांवर चालते – एक रिचार्जेबल Li-ion बॅटरी आणि दुसरी 3xAA कार्बन झिंक बॅटऱ्या.
केवळ ₹399/- मध्ये मिळणारी ही टॉर्च लाल आणि हिरव्या अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध असून ती भारतभरातील आघाडीच्या किरकोळ दुकानांमध्ये आणि प्रमुख ई-कॉमर्स वेबसाइट्सवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.
नवीन आणि उपयुक्त उत्पादने देण्याच्या उद्देशातून एव्हररेडीने मागील वर्षी एव्हररेडी सायरन टॉर्च सादर केली होती.
ही एक अनोखी टॉर्च असून त्यामध्ये 100 डेसिबल आवाजाचा जोरदार अलार्म आहे, जो कीचेन खेचल्यावर वाजतो – विशेषतः महिलांसाठी सुरक्षेचा प्रभावी उपाय. छोट्या आकाराची, रिचार्जेबल आणि सहज बरोबर वाहून नेता येणारी ही टॉर्च एव्हररेडीची सुरक्षा आणि दैनंदिन उपयोगासाठी स्मार्ट उपाय निर्माण करण्याची कल्पकता दाखवते.