ज्ञानेशकडे हॉकी महाराष्ट्राचे नेतृत्व – चेन्नईमध्ये होणाऱ्या सब-ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेसाठी १८ जणांचा संघ जाहीर

पुणे, ३० जुलै: चेन्नईमध्ये (तामिळनाडू) होणाऱ्या १५व्या हॉकी इंडिया सब-ज्युनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद २०२५  स्पर्धेसाठीच्या हॉकी महाराष्ट्र संघाचे नेतृत्व ज्ञानेश कुमार विजकापे भूषविणार आहेत.महाराष्ट्राच्या १८ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली असून जॉर्डन डेसमंडची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आले आहे.

ही स्पर्धा २८ जुलै ते ८ ऑगस्ट २०२५ दरम्यान खेळली जाणार आहे.

नेहरूनगर येथील पीसीएमसी हॉकी स्टेडियम येथे ७ दिवसांच्या सराव शिबिरानंतर हॉकी महाराष्ट्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि हॉकी इंडियाचे सह-उपाध्यक्ष मनोज घोरे यांनी महाराष्ट्र संघाची घोषणा केली.

सब-ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेमध्ये चार गट असून त्यात प्रत्येकी ३ संघांचा समावेश आहे. हॉकी महाराष्ट्राचा ड गटात समावेश असून हॉकी असोसिएशन ऑफ ओदिशा आणि हॉकी चंदीगड असे अन्य संघ या गटात आहेत. 

हॉकी महाराष्ट्र संघाचा सलामीचा सामना १ ऑगस्ट रोजी हॉकी असोसिएशन ओदिशाविरुद्ध होईल. गटवार साखळीमधील दुसरा सामना ३ ऑगस्ट रोजी हॉकी चंदीगडविरुद्ध होणार आहे.

प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ ५ ऑगस्टपासून होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील. ६ ऑगस्ट रोजी उपांत्य फेरी आणि ८ ऑगस्ट रोजी तिसऱ्या क्रमांकासह अंतिम फेरी होईल. 

एकंदरीत हॉकी महाराष्ट्र स्पर्धेच्या अ गटामध्ये समाविष्ट आहे.