पुणे,21 जुलै 2025: पीबीएमएच्या एच व्ही देसाई आय हॉस्पिटल येथे दोन वर्षांचा डिप्लोमा इन ऑप्थॅल्मिक असिस्टंट अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू झाला आहे . महाराष्ट्र बोर्ड/सेंट्रल बोर्ड व इतर मंडळ मान्यता प्राप्त असलेल्या शाळेतून बारावी उत्तीर्ण असलेल्या 30 विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेता येणार आहे. या अभ्यासक्रमाला नॅशनल कौन्सिल ऑफ व्होकेशनल अँड रिसर्च ट्रेनिंगची मान्यता आहे.
अधिक माहितीसाठी 7887785226 या क्रमांकावर सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत संपर्क साधता येणार आहे.
प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या कार्यालयात अभ्यासक्रमाचा फॉर्म भरून त्यासोबत आवश्यक प्रमाणपत्रांच्या प्रति जोडणे गरजेचे आहे. गरजू विद्यार्थ्यांसाठी हडपसर येथे हॉस्पिटल जवळ राहण्याची सोय व जेवणाची सोय किंवा त्यासाठीचे अनुदान आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या काही विद्यार्थ्यांना अनुदान दिले जाईल.
