ड्रोन प्रशिक्षणासाठी ड्रोनआचार्यला डीजीसीएची मंजुरी

पुणे, ३० जुलै: ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन्स लिमिटेडला आयआयटी रोपर (पंजाब) येथील रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन (आरपीटीओ) साठी नागरी उड्डाण महासंचालनालयाकडून (DGCA) अद्ययावत मंजुरी मिळाली आहे. याअंतर्गत आता मध्यम श्रेणीतील ड्रोनसाठी प्रशिक्षण घेता येणार आहे. याआधी फक्त लहान श्रेणीतील ड्रोन प्रशिक्षणासाठी मान्यता होती, मात्र आता रोटरक्राफ्ट श्रेणीतील RPA (Remotely Piloted Aircraft System) साठी VLOS (Visual Line of Sight) ऑपरेशन्स अंतर्गत लहान व मध्यम दोन्ही श्रेणींचा समावेश करण्यात आला आहे.

ड्रोनआचार्यने यापूर्वी आयआयटी रोपरमधून देशभरातील १५०० पेक्षा अधिक DGCA प्रमाणित ड्रोन वैमानिकांना प्रशिक्षण दिले असून त्यात संरक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता. तसेच C-PYTE (Centre for Placement of Youth Trained in Employable Skills) च्या सहकार्याने पंजाबमधील १५० तरुणांना ड्रोन ऑपरेशन व कृषी अनुप्रयोग क्षेत्रातही प्रशिक्षण देण्यात आले आहे.

ही सुधारित मंजुरी मिळाल्यामुळे आता आयआयटी रोपर येथील आरपीटीओ केंद्रात हवाई छायाचित्रण, GIS साठी ड्रोन डेटा प्रक्रिया, ड्रोन बांधणी, अ‍ॅग्री-ड्रोन, Python आणि GIS, प्रगत LiDAR आणि GIS, आपत्ती व्यवस्थापन, तसेच ड्रोन रेसिंगसारखे अभ्यासक्रम शिकवले जात आहेत. हे सर्व प्रशिक्षण DGCA प्रमाणित असून स्किल इंडिया, ड्रोन शक्ती आणि नमो ड्रोन दीदी सारख्या राष्ट्रीय उपक्रमांना बळकट करण्यास मदत करत आहेत.

या संदर्भात ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन्स लिमिटेडचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक प्रतीक श्रीवास्तव म्हणाले, “आयआयटी रोपर येथील आरपीटीओमध्ये मध्यम श्रेणी प्रमाणपत्राचा समावेश करणे हे आमच्यासाठी एक महत्त्वाचे धोरणात्मक पाऊल आहे. यामुळे प्रगत ड्रोन ऑपरेशन्समधील कौशल्य अंतर भरून काढता येईल आणि राष्ट्रीय पातळीवरील उपक्रमांना बळकटी देता येईल.”

ते पुढे म्हणाले, “ड्रोन ऑपरेशन्स, दुरुस्ती, हवाई नकाशे तयार करणे आणि पेलोड हाताळणी या गोष्टी आता राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखडा (NSQF) अंतर्गत ३ ते ६ स्तरांशी जोडल्या गेल्या आहेत. आमचे प्रशिक्षणक्रम तांत्रिकदृष्ट्या प्रगत व उद्योगानुरूप व्यावसायिक घडवण्यासाठी आखले आहेत. GIS, Python, Agri-Tech व सिनेमॅटोग्राफी क्षेत्रात DGCA मान्यताप्राप्त कौशल्ये देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे युवक, महिला व स्वयं-सहायता गटांसाठी नव्या संधी उपलब्ध होतात.”

ड्रोनआचार्य हा भारतातील अग्रगण्य DGCA-प्रमाणित आरपीटीओ असून महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, पंजाब, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू यांसारख्या राज्यांमध्ये त्यांच्या कार्यशाळा व प्रशिक्षण केंद्रे कार्यरत आहेत.

अधिक माहितीसाठी भेट द्या : https://droneacharya.com/