पुणे, 22 जुलै 2025 : सीएनएच या कंपनीचा ब्रँड असलेल्या केस कन्स्ट्रक्शन इक्विपमेंटने पुण्यात त्यांच्या CEV Stage V मानकांनुसार सुसज्ज असलेल्या मशीनची नवी श्रेणी सादर केली. भारतीय बाजारासाठी भविष्यकालीन आणि शाश्वत बांधकाम उपाययोजना पुरवण्याच्या केस कंपनीच्या बांधिलकीचा हा महत्त्वाचा टप्पा आहे.
ही यंत्रे कंपनीच्या पुण्यातील डीलरशिपमध्ये सादर करण्यात आली, जी लातूर, नांदेड, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांनाही सेवा देते. या कार्यक्रमाला केस कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट इंडिया आणि सार्कचे व्यवस्थापकीय संचालक श्री. शलभ चतुर्वेदी, नेटवर्क डेव्हलपमेंट प्रमुख श्री. रवींद्र अश्तेकर आणि पश्चिम विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. ध्रुमिल शाह उपस्थित होते. एसएस हेवी इक्विपमेंटचे डीलर प्रिन्सिपल श्री. संतोष चौगुले यांनीदेखील ग्राहकांशी संवाद साधत या लोकार्पणाचा प्रादेशिक महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमात बोलताना केस कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट इंडिया आणि सार्कचे व्यवस्थापकीय संचालक श्री. शलभ चतुर्वेदी म्हणाले, “केसमध्ये आम्ही नेहमीच अधिक ताकदवान आणि उत्कृष्ट कार्यक्षमतेची यंत्रे तयार करण्यावर भर दिला आहे. आमची ही नवीन StageV मालिका केवळ नवीनतम CEV नियमांनुसार अनुरूप नाही, तर सुरक्षितता, आराम आणि उत्पादकता वाढवण्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक डिझाइन करण्यात आली आहे. या नव्या मालिकेमुळे आमच्यावर ग्राहकांनी दाखवलेला विश्वास अधिक दृढ होतो — हेच आहे ‘केसचा भरोसा’.”

नवीन सादर केलेल्या Stage V मालिकेत सुधारित बॅकहो लोडर मॉडेल्स – 770NX, 851NX आणि 770NX Magnum यांचा समावेश आहे, तसेच व्हायब्रेटरी कॉम्पॅक्टर 952NX आणि 1107NX देखील या श्रेणीत आहेत. ही सर्व यंत्रे अत्याधुनिक FPT इंजिनद्वारे चालवली जात असून नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, इंधन कार्यक्षमता, ऑपरेटरसाठी जास्तीत जास्त आराम आणि नवीनतम प्रदूषण नियमांचे पालन करण्याच्या केसच्या वचनबद्धतेचा प्रत्यय देतात.
या संपूर्ण श्रेणीत 952NX व्हायब्रेटरी कॉम्पॅक्टर आणि 450NX मिनी कॉम्पॅक्टर हे दोन मॉडेल्स पूर्णपणे नव्याने सादर करण्यात आले आहेत — हे केवळ इंजिन अपडेट्स नसून, संपूर्णतः नवीन डिझाईनसह विकसित करण्यात आलेली यंत्रे आहेत, ज्यामध्ये प्रगत अभियांत्रिकी आणि अधिक सुधारित कार्यक्षमता उपलब्ध करून देण्यात आली आहे.
भारतीय कार्य परिस्थिती लक्षात घेऊन या नव्या यंत्रांची खास रचना करण्यात आली आहे. या यंत्रांमध्ये डाउनटाईम कमी करणाऱ्या, देखभाल सुलभ करणाऱ्या आणि कठीण कार्यस्थळी देखील सातत्याने उत्कृष्ट कामगिरी देणाऱ्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. यासोबतच केसने प्रगत सुरक्षाविषयक सुधारणा देखील केल्या आहेत आणि ऑपरेटरचा आराम व सोपी वापर प्रक्रिया या गोष्टी यंत्रांच्या डिझाईनच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आल्या आहेत, ज्यामुळे उत्पादकता आणि वापराचा अनुभव दोन्ही अधिक चांगला होतो.
1842 पासून जागतिक स्तरावर बांधकाम उपकरण क्षेत्रात आघाडीवर असलेली केस कंपनी 1989 पासून भारतात कार्यरत आहे. व्हायब्रेटरी कॉम्पॅक्टर या विभागात कंपनीने नेहमीच बाजारपेठेतील आघाडीचे स्थान टिकवले असून बॅकहो लोडर विभागात देखील कंपनी एक महत्त्वाचा स्थानिक खेळाडू म्हणून ओळखली जाते.