मुंबई, 23 जुलै 2025 – ॲक्सिस बँकेची संपूर्ण मालकीची उपकंपनी आणि भारतातील कॉर्पोरेट व फिड्युशरी सेवा क्षेत्रातील अग्रगण्य नाव ॲक्सिस ट्रस्टी सर्व्हिसेस लिमिटेड (एटीएसएल) ने AVA (ॲक्सिस ट्रस्टी व्हर्च्युअल असिस्टंट) हा भारतीय ट्रस्टी सेवा क्षेत्रातील पहिला एआय प्रणीत चॅटबॉट सादर केला असल्याची घोषणा केली आहे. AVA च्या माध्यमातून ॲक्सिस ट्रस्टी त्यांच्या डिजिटल परिवर्तन प्रवासात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत असून, फिनटेकद्वारे चालवल्या जाणाऱ्या ट्रस्टी सोल्युशन्समध्ये त्यांचे स्थान अग्रणी आहे याला पुन्हा एकदा पुष्टी मिळत आहे.
वेगवेगळ्या टच पॉइंट्सवर ग्राहकांना गरजेच्या वेळी मिळणारे, स्मार्ट आणि विना अडथळा सहाय्य पुरविण्याच्या दृष्टीने AVA ची रचना करण्यात आली आहे. आपल्या सेवा वितरण मॉडेलमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) समाविष्ट करून तत्काळ सहाय्य, सुधारलेली पारदर्शकता आणि कार्यक्षमतेत वाढ यांच्या माध्यमातून ग्राहकांना मिळणारा अनुभव उंचावण्याचे आणि नव्याने परिभाषित करण्याचे ॲक्सिस ट्रस्टीचे उद्दिष्ट आहे. हा व्हर्च्युअल असिस्टंट ग्राहक संवादाच्या किंवा त्यांना सेवा पुरविण्याच्या तीन प्रमुख स्तंभांवर लक्ष केंद्रित करत आहे:
उत्पादन आणि सेवा यांच्याशी संबंधित शंका
AVA वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची तत्काळ उत्तरे देतो आणि ॲक्सिस ट्रस्टीच्या विविध सेवा व उत्पादनांबाबत सविस्तर माहिती पुरवतो. ग्राहक 24/7 केव्हाही ही माहिती मिळवू शकतात. त्यामुळे कोणतीही विलंब न होता रिअल-टाईम म्हणजेच गरजेच्या हव्या त्या वेळी सहाय्य उपलब्ध होते.
सेवा विनंती व्यवस्थापन
सध्याचे ग्राहक AVA च्या माध्यमातून सहजतेने सेवा मिळण्याविषयक विनंती करू शकतात. सर्व संवाद लॉग, ट्रॅक आणि ठराविक टर्नअराउंड टाइम (TAT) मध्ये कार्यक्षमतेने पूर्ण केले जातात. त्यातून विश्वासार्हता आणि पारदर्शकता सुनिश्चित होते.
प्रक्रिया आणि व्यवहार संबंधित शंका वा प्रश्न
AVA सर्व ट्रस्टी सेवा अंतर्गत असलेल्या प्रक्रिया व व्यवहार संबंधित शंकांवर तत्काळ सहाय्य पुरवतो. त्यामध्ये दस्तऐवजीकरण, कमप्लायन्स वर्कफ्लोज आणि विशिष्ट नियामक नियम यांचा समावेश आहे. हे सहाय्य सध्याच्या नियमांशी सुसंगत मार्गदर्शन पुरविते आणि ग्राहकांना सुव्यवस्थित प्रतिसाद मिळेल हे सुनिश्चित करते.
सादरीकरणावेळी बोलताना ॲक्सिस ट्रस्टी सर्व्हिसेस लिमिटेडचे एमडी & सीईओ श्री. राहुल चौधरी म्हणाले, “AVA ही आमच्या डिजिटली सक्षम, ग्राहक-केंद्रित ट्रस्टी भागीदार होण्याच्या प्रवासातील एक महत्वाचे, निर्णायक पाऊल आहे. आजच्या वेगवान आर्थिक परिसंस्थेत जलद आणि सहज ग्राहक संवादाची गरज कधी नव्हती एवढी अधिक महत्त्वाची झाली आहे. AVA हा केवळ एक चॅटबॉट नाही तर नाविन्यपूर्णता, पारदर्शकता आणि ग्राहकांना गरज असेल तेव्हा त्यावेळी लगेच सहाय्य पुरविण्याच्या बांधिलकीचं प्रतीक आहे. आमच्या फिनटेक परिवर्तन प्रवासादरम्यान, AVA विश्वास निर्माण करण्यात आणि आमच्या सर्व भागधारकांना उत्कृष्ट सेवा अनुभव देण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.”
गेल्या काही वर्षांमध्ये ॲक्सिस ट्रस्टीने निश्चित उद्दिष्ट ठेऊन केलेल्या उपक्रमांच्या माध्यमातून भारतात ट्रस्टी सेवांची व्याख्या सतत बदलली आहे. ऑटोमेशन, डिजिटल डॉक्युमेंटेशन आणि आता एआयच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा सहाय्य यामध्ये गुंतवणूक करून, ॲक्सिस ट्रस्टी स्वतःला लवचिक, प्रतिसादक्षम आणि भविष्यासाठी सज्ज ठेऊन पुढील पिढीचा अत्याधुनिक ट्रस्टी म्हणून सादर करत आहे