श्रावण महिना हा भगवान शिवशंकराला अतीव प्रिय मानला जातो. या महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून अनेक भक्त १६ सोमवार व्रत करण्यास सुरुवात करतात. हे व्रत एक संकल्पपूर्वक साधना असून १६ सोमवारी उपवास केल्यानंतर १७ व्या सोमवारी व्रताचे उद्यापन केले जाते. मात्र, या कालावधीत जर मासिक पाळी (पीरियड्स) आली, तर अनेक महिलांना व्रत कसे पार पाडावे, याबाबत संभ्रम निर्माण होतो. चला, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
पाळीच्या काळात पूजा करता येते का?
हिंदू परंपरेनुसार मासिक पाळी दरम्यान महिलांनी पूजा, अर्चा किंवा मंदिरात जाणं टाळावं असं सांगितलं जातं. त्यामुळे १६ सोमवार व्रत करताना पाळी आली, तर पूजा थोडक्याच काळासाठी थांबवावी लागते. मात्र याचा अर्थ असा नाही की व्रत पूर्ण होणार नाही किंवा संकल्प भंग होतो.
व्रत थांबवायचं का? की सुरू ठेवायचं?
जर पाळीच्या दिवसात सोमवार आला तर:
-
व्रत थांबवण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तुमचा उपवास सुरू ठेवू शकता.
-
फक्त त्या दिवशी प्रत्यक्ष पूजा किंवा शिवलिंगाला स्पर्श करणं टाळावं.
-
त्याऐवजी तुम्ही मनातल्या मनात शिव नामस्मरण, मंत्रजप, किंवा स्तोत्र पठण करू शकता.
पूजेचं काय?
-
पूजेसाठी इतर एखाद्या महिला नातेवाइकांकडून किंवा घरी असलेल्या दुसऱ्या व्यक्तीकडून पूजा करून घेऊ शकता.
-
पाळी संपल्यानंतर, विधीवत पूजेची भरपाई करू शकता.
-
व्रत चालू ठेवल्यामुळे त्याचे धार्मिक फळ अबाधित राहते.
१७ व्या सोमवारी उद्यापन गरजेचं
मासिक पाळीमुळे काही सोमवार चुकला असला तरीही, १७ व्या सोमवारी व्रताचं उद्यापन करणं आवश्यक आहे. भगवान शिव भक्तांच्या भावनेला आणि निष्ठेला महत्त्व देतात. त्यामुळे शुद्ध अंतःकरणाने केल्यास व्रताचं पूर्ण फळ लाभतं, असं शास्त्रात सांगितलं आहे.
थोडक्यात काय?
-
पाळी आली तरी व्रत सुरू ठेवता येतं.
-
पूजेत सहभागी होण्याऐवजी मंत्रजप करा.
-
शक्य असल्यास दुसऱ्या व्यक्तीमार्फत पूजा पार पाडा.
-
पाळी संपल्यानंतर विधीवत पूजा करा.
-
शेवटी १७ व्या सोमवारी उद्यापन अवश्य करा.
भगवान शंकर भक्तांच्या भावनांचा स्वीकार करतात. त्यामुळे श्रद्धा आणि निष्ठा ठेवून १६ सोमवार व्रत पार पाडल्यास, इच्छित फलप्राप्ती निश्चित होते, असा विश्वास आहे.