वेदांता लिमिटेडने गेल्या दशकात सरकारी तिजोरीत सुमारे ₹4.5 लाख कोटींचे योगदान दिले; वित्तीय वर्ष 2024-25 मध्ये ₹55,349 कोटी

By: Editor_Manas

On: Saturday, June 21, 2025 1:10 PM

Google News
Follow Us

वेदांता लिमिटेडने आपल्या वार्षिक Tax Transparency Report (TTR) च्या दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन करताना पारदर्शक आणि जबाबदार कर धोरणांबाबतची आपली वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली. आर्थिक वर्ष 15-16 ते आर्थिक वर्ष 24-25 या कालावधीत कंपनीने आपल्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारांमधून एकूण 4,48,830 कोटी रु. चे उत्पन्न शासनाकडे जमा केले. एकट्या आर्थिक वर्ष 25 मध्येच, वेदांताने थेट आणि अप्रत्यक्ष कर, रॉयल्टी, लाभांश आणि अन्य कायदेशीर देयकांच्या माध्यमातून एकूण 55,349 कोटी रु. (एकत्रित महसुलाच्या 37%) इतके योगदान दिले. यापैकी, 54,595 कोटी रु. भारत सरकारकडे जमा करण्यात आले.

भारतामध्ये, वेदांताचे कामकाज 15 राज्यांमध्ये चालते. त्यामध्ये आर्थिक वर्ष 25 मध्ये राजस्थान ऑपरेशन्सने 25,436 कोटी रु. आणि ओडिशा ऑपरेशन्सने 9,176 कोटी रु. इतके योगदान दिले आहे.

वेदांता लिमिटेडचे अध्यक्ष अनिल अगरवाल यांनी भारत सरकार व सर्व भागधारकांचे कंपनीवरील विश्वासाबद्दल आभार मानले आणि म्हणाले, “राष्ट्रनिर्मिती हेच आमच्या कार्याचे केंद्र आहे. आमचे खनिज, साहित्य आणि ऊर्जा देशाच्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहेत. भारतातील अग्रगण्य खनिज, धातू आणि नैसर्गिक संसाधन कंपनी म्हणून आम्ही स्वतःकडे या नव्या युगाचे लाभार्थी आणि प्रेरक अशा दोन्ही नजरेने बघतो.”

आर्थिक वर्ष 25 मध्ये कंपनीने 24,649 कोटी रु. कर रूपाने म्हणजेच उत्पन्न व भांडवली कर, शासकीय रॉयल्टी आणि अन्य कर स्वरूपात भरून योगदान दिले. त्याचप्रमाणे, अप्रत्यक्ष कर, withholding कर व इतर अप्रत्यक्ष स्वरूपातील योगदान 27,081 कोटी रु. होते. तसेच भारत सरकारला 3,619 कोटी रु. चा लाभांशही देण्यात आला. कंपनीच्या TTR नुसार, आर्थिक वर्ष 25 मध्ये झिंक विभागाचे योगदान 19,359 कोटी रु. इतके होते. हे सर्व व्यवसाय शाखांमधून सर्वाधिक होते. त्यापाठोपाठ अॅल्युमिनियम व्यवसायाचे योगदान 12,350 कोटी रु. आणि तेल व वायू व्यवसायाचे 10,195 कोटी रु. होते.

“वेदांतामध्ये आम्ही सुशासनावर खूप भर देतो. ESG मधील ‘G’ (Governance) म्हणजेच प्रशासन या घटकाकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते, पण तोच एका शाश्वत व्यवसायाचा कणा असतो. तत्व-मूल्य यांच्याशी निगडीत प्रामाणिकतेवर आधारित प्रक्रिया राबविण्यासाठी आम्ही बांधील असून दीर्घकालीन मूल्यनिर्मितीवर लक्ष केंद्रित करतो. सलग दहा वर्षे हा अहवाल प्रसिद्ध करताना प्रशासनावरील आमचा विश्वास ही जबाबदारी केवळ अनुपालनापुरती मर्यादित नसून कॉर्पोरेट नागरिकत्वाचे एक मूलभूत तत्व आहे हे यातून प्रतिबिंबित होते,” असे हिंदुस्तान झिंकच्या अध्यक्ष आणि वेदांता लिमिटेडच्या नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर प्रिया अगरवाल हेब्बार यांनी अधोरेखित केले.

 कंपनी गेली दहा वर्षे स्वयंप्रेरणेने Tax Transparency Report प्रकाशित करत आहे. जागतिक सर्वोत्तम पद्धतीशी सुसंगत राहत हा अहवाल कंपनीच्या कर धोरणांबाबत, सुशासन प्रक्रियांबाबत व देशानुसार योगदानाबाबत सखोल माहिती देतो. या अहवालात B Team Responsible Tax Principles आणि EITI या दोन प्रमुख चौकटींचा आधार घेतलेला आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026