Pune Crime : पुणे पोलिसांची जबरदस्त कारवाई : ६९ लाखांच्या सोन्या चोरीतील मुख्य आरोपी राजस्थानमधून अटकेत

By: Editor_Pratik

On: Sunday, June 29, 2025 8:49 AM

Pune Crime
Google News
Follow Us

Pune Crime : पुणे पोलिसांची जबरदस्त कारवाई : ६९ लाखांच्या सोन्या चोरीतील मुख्य आरोपी राजस्थानमधून अटकेत

पुणे : गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने अत्यंत कौशल्याने आणि धडाडीने केलेल्या कारवाईत ६९ लाख रुपयांच्या सोन्याच्या जबरी चोरी प्रकरणातील मुख्य आरोपीला राजस्थान येथून अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे एक मोठा गुन्हा उघडकीस आला असून पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा गुन्हेगारीविरोधात आपली ताकद दाखवून दिली आहे.

BIG NEWS : भरदिवसा थरार; सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची निर्घृण हत्या; शहरात खळबळ

११ जून २०२५ रोजी बंडगार्डन रेल्वे स्टेशन परिसरात, मुंबईहून आलेल्या एका प्रसिद्ध ज्वेलरी शोरूमच्या कर्मचाऱ्यांकडून ७४० ग्रॅम सोन्याचे दागिने (अंदाजे किंमत ६९ लाख रुपये) जबरदस्तीने हिसकावण्यात आले होते. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासाची जबाबदारी गुन्हे शाखा युनिट २ कडे देण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासात राजस्थानातील सराईत गुन्हेगार रूपसिंग गुलाबसिंग रावत (वय ३१, रा. देलरा, ता. अमीठ, जि. राजसमंद) याच्याकडे संशयाची सुई वळली.

कर्क राशीत असताना चंद्राने अश्लेषा नक्षत्रात प्रवेश केला; 3 राशींचे नशीब पलटणार, राजयोगाची शक्यता

तो सतत ठिकाण बदलून पोलिसांपासून बचावत होता. मात्र गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवत, स्थानिक पोलिसांच्या मदतीने २६ जून रोजी दिवेर, राजस्थान येथून त्याला ताब्यात घेतले.

आरोपीकडून २४९.५० ग्रॅम वजनाचे, सुमारे १८.६६ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. उर्वरित चोरीस गेलेल्या दागिन्यांचा शोध अद्याप सुरू आहे.

ही यशस्वी कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, पोलीस उपायुक्त (आर्थिक व सायबर गुन्हे) विवेक मासाळ, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे १) गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईत योगदान देणारे अधिकारी व कर्मचारी : स.पो.नि. आशिष कवठेकर, स.पो.नि. अमोल रसाळ, पो.अं. शंकर नेवसे, उज्वल मोकाशी, संजय जाधव, शंकर कुंभार, गणेश थोरात, साधना ताम्हाणे, निखिल जाधव, ओमकार कुंभार, अमोल सरडे, विनोद चव्हाण, नागेश राख, पुष्पेंद्र चव्हाण, संतोष टकले, विजय पवार आणि संजय आबनावे.

ही धाडसी कारवाई पुणे गुन्हे शाखेच्या कार्यक्षमतेचे प्रतीक ठरली असून, कायदा आणि सुव्यवस्थेच्या रक्षणासाठी पोलिसांचे हे प्रयत्न नक्कीच गौरवास्पद आहेत.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now