तलाव संवर्धन आणि हवामान स्थिरतेच्या दिशेने मित्‍सुबिशी इलेक्ट्रिक इंडियाचा सीएसआर उपक्रम

पुणे : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निर्मिती, विपणन आणि विक्रीमध्ये जागतिक स्तरावर मान्यताप्राप्‍त मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडियाने अर्थवॉच इन्स्टिट्यूट इंडियाच्या सहयोगाने सीएसआर उपक्रम सुरू केला आहे. तलावांचे आणि त्यांच्या सभोवतालच्या जैवविविधतेचे संवर्धन करण्यावर लक्ष केंद्रित करणारा हा प्रकल्प पुण्याजवळील तळेगाव दाभाडे आणि पिंपरी चिंचवड या भागात राबविला जात आहे.

हा उपक्रमाचा उद्देश लसंवर्धनाच्या पलीकडे विस्तारित आहे, तो लोक, निसर्ग आणि शिक्षण यांच्यातील संबंध वाढवून कायमस्वरूपी बदल घडवून आणण्याचा प्रयत्‍न करणे आहे.

महिला आणि मच्छीमार समुदायांसह २५ सेल्फ-हेल्‍प ग्रुप्‍सना तलावाचे रक्षक म्हणून काम करण्यासाठी आणि स्थानिक संवर्धन प्रयत्‍नांचे नेतृत्व करण्यासाठी प्रशिक्षण देणे,मातीची धूप कमी करण्यासाठी, काठ संधारण करण्यासाठी आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी तळेगाव दाभाडे व पिंपरी चिंचवडमधील तलावाभोवती वृक्षारोपण करणे,पर्यावरणीय संतुलन वाढवण्यासाठी आणि जैवविविधतेला साह्य करण्यासाठी स्थानिक प्रजातींकरिता योग्य परिसंस्था स्थापन करण्यावर काम करणे,पाण्याची गुणवत्ता, आरोग्य, स्वच्छता या विषयांवर नागरिक विज्ञान कार्यक्रम आणि शालेय कार्यशाळेंचे आयोजन करणे,या प्रमुख गोष्टी या उपक्रमांमध्ये समाविष्ट आहेत

“वाढत्या हवामान धोक्यांना तोंड देताना जलस्रोतांचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे. या उपक्रमाद्वारे आम्ही महत्वाच्या परिसंस्थांचे संवर्धन करण्‍यासोबत व्‍यक्‍तींना, विशेषतः तरुण पिढीला पर्यावरणीयदृष्ट्या जबाबदार पद्धती स्वीकारण्यास प्रेरित करत आहोत,”असे मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अत्सुशी ताकासे म्हणाले. “स्वच्छ हवा, पाणी आणि हरित जागांवर आमचे लक्ष केंद्रित करणे हे सर्वांसाठी निरोगी राहणीमान निर्माण करण्याच्या आमच्या दीर्घकालीन वचनबद्धतेला दर्शवते.”

हा उपक्रम मार्च २०२६ पर्यंत सुरू राहील, ज्यामध्ये हवामान बदलाबद्दल जागरूकता वाढवत असतानाच या जलस्रोतांचे संवर्धन करण्यासाठी विविध भागधारक आणि सामुदायिक नेटवर्कसह विविध उपक्रम राबवण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.