नवीन सीआरएम-डीएमएस व एआय-पॉवर्ड अॅप्लीकेशन्स ग्राहक अनुभव उत्साहित करणार, डिलर ऑपरेशन्स सुव्यवस्थित करणार आणि व्यवसाय विकासाला गती देणार
फोर्स मोटर्स लिमिटेड ही प्रमुख ऑटोमोटिव्ह कंपनी आणि भारतातील सर्वात मोठ्या व्हॅन उत्पादक कंपनीने ग्राहक अनुभव व डिलर व्यवस्थापन सिस्टम्स अपग्रेड करण्यासाठी झोहो कॉर्पोरेशनसोबत धोरणात्मक सहयोगाची घोषणा केली आहे. हा सहयोग फोर्स मोटर्सचा डिजिटल परिवर्तन उपक्रम प्रोजेक्ट डिजिफोर्समधील महत्त्वाचा टप्पा आहे. या उपक्रमाचा मूल्य साखळीमधील दर्जात्मक तंत्रज्ञानांच्या माध्यमातून नाविन्यतेला चालना देण्याचा, उत्पादकता सुधारण्याचा आणि ग्राहक समाधान वाढवण्याचा मनसुबा आहे.
या उपक्रमाचा भाग म्हणून झोहोचे अॅडवान्स्ड कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट (सीआरएम) व डिलर मॅनेजमेंट सिस्टम (डीएमएस)सह १२ एआय-पॉवर्ड फ्रण्ट-ऑफिस अॅप्लीकेशन्सची श्रेणी फोर्स मोटर्सच्या देशभरातील नेटवर्कमध्ये तैनात करण्यात येईल. हे एकीकृत, क्लाऊड-आधारित सोल्यूशन वारसायुक्त सिस्टम्सच्या जागी बदलण्यात येईल, ज्यामुळे विपणन, विक्री, सेवा, ग्राहक सहभाग आणि अंतर्गत सहयोगाचे आधुनिकीकरण करण्यासाठी अत्याधुनिक क्षमतांचा उपयोग होईल. डिलर ऑपरेशन्स सुव्यवस्थित करत आणि टीम्स, डिलर्स व ग्राहकांसाठी युनिफाइड प्लॅटफॉर्म डिझाइन करत हे नवीन सोल्यूशन सहभागाच्या प्रत्येक टप्प्यावर एकूण ग्राहक अनुभव अधिक उत्साहित करण्यास सज्ज आहे.
फोर्स मोटर्स संपूर्ण भारतात २०० हून अधिक डिलरशिप, ७० अधिकृत सेवा केंद्रे आणि ३० पार्ट्स सेंटर्सचे व्यापक नेटवर्क ऑपरेट करते, ज्यांना २५ हून अधिक देशांमधील आंतरराष्ट्रीय वितरकांचा पाठिंबा आहे. नवीन सीआरएम-डीएमएस सोल्यूशन या डिलर आणि वितरक भागीदारांना अधिक कार्यक्षमतेने कार्य करण्यास सक्षम करेल, ज्यासाठी विक्री व सेवा उत्पादकता वाढवेल, प्रत्येक टचपॉइंटवर ग्राहकांचे समाधान वाढवेल आणि अधिक व्यावसायिक, डेटा-चालित व्यवसाय ऑपरेशन्सना साह्य करेल.
या सहयोगाच्या धोरणात्मक महत्त्वाबाबत मत व्यक्त करत फोर्स मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रसन फिरोदिया म्हणाले, “प्रोजेक्ट डिजिफोर्स आणि झोहोसोबत सहयोगाच्या माध्यमातून आमचा ग्राहकांना अनुभव देण्याच्या पद्धतीमध्ये मोठे परिवर्तन घडवून आणण्याचा मनसुबा आहे. झोहोचे तंत्रज्ञान सोल्यूशन्स भारतातील, तसेच जागतिक बाजारपेठांमधील आमचे डिलर्स व वितरण भागीदारांच्या क्षमता देखील वाढवतील. भारतातील जागतिक तंत्रज्ञान लीडर झोहोसोबतचा आमचा सहयोग भारतात नाविन्यता आणि तंत्रज्ञान विकासाला पाठिंबा देण्याप्रती फोर्स मोटर्सच्या कटिबद्धतेशी परिपूर्णपणे संलग्न आहे.”
“फोर्स मोटर्स दीर्घकाळापासून स्वदेशी अभियांत्रिकी सर्वोत्तमतेचे प्रतीक आहे, तसेच कंपनीला देशभरातील प्रबळ डिलर नेटवर्क आणि वाढत्या जागतिक फूटप्रिंटचे पाठबळ आहे. प्रोजेक्ट डिजिफोर्ससह ते शोध व खरेदीपासून सर्विस, सपोर्ट व मालकीहक्कापर्यंतच्या संपूर्ण लाइफसायकलमध्ये ग्राहक सहभाग अधिक उत्साहपूर्ण करण्यासाठी दूरगामी डिजिटल दृष्टिकोनासह वारसाला अधिक दृढ करत आहेत. या सहयोगामधून विकासाचे धोरणात्मक स्रोत म्हणून ग्राहक अनुभवाला अधिक उत्साहपूर्ण करण्याप्रती समान कटिबद्धता दिसून येते. सहयोगाने, आम्ही कनेक्टेड इकोसिस्टम डिझाइन करत आहोत, जेथे तंत्रज्ञान ऑपरेषन्स सुलभ करते, सहयोग दृढ करते आणि प्रत्येक टचपॉइण्टवर संदर्भीय, सर्वोत्तम सहभाग देते,” असे झोहोचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनी वेम्बू म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “आम्हाला फोर्स मोटर्ससोबत त्यांच्या डिजिटल परिवर्तन प्रवासासाठी सहयोग करण्याचा आनंद होत आहे. झोहो प्लॅटफॉर्म या उत्क्रांतीमध्ये मॉड्युलरिटी, व्हर्टिकल सखोलता व चपळता घेऊन येते. फोर्स मोटर्स विकासाच्या पुढील टप्प्याच्या दिशेने वाटचाल करत असल्यामुळे आम्ही या सहयोगाला खूप महत्त्व देतो.”
हा धोरणात्मक उपक्रम अपवादात्मक ग्राहक अनुभव देण्याप्रती, तसेच विकास व कार्यक्षमतेला गती देण्यासाठी डिलर नेटवर्कला भविष्यासाठी सुसज्ज टूल्ससह सक्षम करण्याप्रती फोर्स मोटर्सच्या कटिबद्धतेला दृढ करतो. या सहयोगासह फोर्स मोटर्सने आपल्या डिजिटल परिवर्तन प्रवासामध्ये मोठी झेप घेतली आहे, तसेच भारतातील ऑटोमोटिव्ह क्षेत्रात तंत्रज्ञान अवलंबतेसाठी नवीन मापदंड स्थापित करत आहे.