क्रॉम्प्टनला महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कडून ₹ 101 कोटी रुपायंचा आतापर्यंतचा सर्वात मोठी सौर पंप

By: Editor_Manas

On: Saturday, June 21, 2025 12:37 PM

Google News
Follow Us

भारतातील पंप उद्योगातील एक विश्वासार्ह अग्रणी कंपनी  क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने सौर जल पंप  क्षेत्रातील आजपर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर मिळवून त्यांच्या हरित ऊर्जा प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. पीएम-कुसुम योजनेच्या घटक-बी अंतर्गत, कंपनीला महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्थेकडून  कडून ₹ 101 कोटींपेक्षा जास्त ,  4,500 ऑफ-ग्रिड सोलर फोटोव्होल्टेइक वॉटर पंपिंग सिस्टीम्स  चे संपूर्ण महाराष्ट्रासाठी डिझाइन, उत्पादन, पुरवठा, वाहतूक, स्थापना, चाचणी आणि कार्यान्वयन करण्यासाठी लेटर ऑफ अवॉर्ड/संमतीपत्र  मिळाले आहे.

ही महत्त्वपूर्ण ऑर्डर भारतातील शेतकऱ्यांना सक्षम बनवणाऱ्या शाश्वत सिंचन उपायांना उपलब्ध करून देण्याची क्रॉम्प्टनची निरंतर वचनबद्धता अधोरेखित करते. या टर्नकी प्रकल्पात पाच वर्षांचा सर्वसमावेशक देखभाल/मेन्टेनन्स करार (सीएमसी) देखील समाविष्ट आहे, जो इन्स्टॉल केलेल्या सिस्टीमची दीर्घकालीन विश्वासार्हता आणि समर्थन यांची खात्री करतो. क्रॉम्प्टनचे सौरऊर्जेवर चालणारे प्रगत डीसी सबमर्सिबल पंप,  ऑफ-ग्रिड आणि ग्रामीण भागात पाण्याच्या उपलब्धतेच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी व टिकाऊपणा, उच्च कार्यक्षमता आणि वापरण्यास सुलभता साध्य करण्याकरिता विशेषतः डिझाइन केलेले आहेत. प्रकल्पाच्या संपूर्ण जीवनचक्रात अखंड कार्य आणि संचालनात उत्कृष्टता सुनिश्चित करण्यासाठी कंपनी तिचे प्रशिक्षित फील्ड कर्मचारी, स्थानिक जिल्हा सेवा पथके आणि सुदृढ विक्री-पश्चात सेवा नेटवर्कचा वापर करेल.

शेतकऱ्यांचे पारंपारिक ऊर्जा स्रोतांपासून अक्षय सौर ऊर्जेकडे स्थित्यंतर सुलभ करण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टांशी हा उपक्रम थेट जुळतो, ज्यामुळे आर्थिक बचत आणि पर्यावरणीय लाभ दोन्ही प्राप्त होतात. शेती, ग्रामीण पाणीपुरवठा आणि ऑफ-ग्रिड ॲप्लिकेशन्सच्या वाढत्या मागणीमुळे भारतातील सबमर्सिबल वॉटर पंप बाजारपेठेत होत असलेल्या जलद वाढीच्या पार्श्वभूमीवर ही ऑर्डर प्राप्त झाली आहे. अनियमित पाऊस आणि मर्यादित ग्रिड पॉवर असलेल्या प्रदेशांमध्ये सौरऊर्जेवर चालणार्‍या सबमर्सिबल पंपांचे स्थान महत्त्वाचे बनत आहे कारण या मुळे अविरत आणि शाश्वत सिंचन शक्य होते.

क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या होम इलेक्ट्रिकल्स आणि पंप्सचे व्यवसाय प्रमुख श्री. रजत चोप्रा म्हणाले, “पीएम-कुसुम योजनेअंतर्गत 4,500 सोलर फोटोव्होल्टेइक वॉटर पंपिंग सिस्टीमसाठी मेडा  कडून पुरस्कार पत्र मिळाल्याने आम्हाला आनंद होत आहे. हा टप्पा केवळ आमच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या सौर पंप ऑर्डरचेच नाही तर भारतातील शेतकऱ्यांच्या गरजांनुसार विश्वसनीय आणि उच्च-कार्यक्षमता पंपिंग निरसने उपलब्ध करण्याच्या आमच्या निरंतर वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. ही ऑर्डर क्रॉम्प्टनचा उत्पादनात उत्कृष्टता, दीर्घकालीन कामगिरी आणि मजबूत सेवा नेटवर्कवरील विश्वास अधिक दृढ करते. सौरऊर्जेवर चालणाऱ्या सिंचनास बढावा देण्यात एक विश्वासार्ह भागीदार म्हणून आमचे स्थान यामुळे आणखी दृढ होते. क्रॉम्प्टनमध्ये, आम्ही शेतकऱ्यांना स्वच्छ ऊर्जा खात्रीदायक रित्या उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत, तसेच गुणवत्ता, नावीन्य आणि भक्कम विक्री-पश्चात सेवेद्वारे अविरत संचालन सुनिश्चित करतो”

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now