Vivo V50 : एलिट एडिशन लाँच – आकर्षक रोझ रेड रंगात, इन-बॉक्स TWS 3E सह उपलब्ध

By: Editor_Pratik

On: Thursday, May 15, 2025 12:15 PM

vivo V50 Elite Edition_Creative 3
Google News
Follow Us

Vivo V50 : एलिट एडिशन लाँच – आकर्षक रोझ रेड रंगात, इन-बॉक्स TWS 3E सह उपलब्ध

स्मार्टफोन मार्केटमध्ये आपली पकड अधिक घट्ट करत, विवोने आज अधिकृतपणे Vivo V50 Elite Edition लाँच केला आहे. विवोच्या लोकप्रिय V50 मालिकेचा हा नवीन आणि प्रीमियम व्हेरिएंट खास आकर्षक रोझ रेड रंगात सादर करण्यात आला आहे. या फोनची किंमत ₹41,999 असून तो फ्लिपकार्ट, Amazon आणि ऑफलाइन रिटेल स्टोअर्सवर आजपासून विक्रीसाठी उपलब्ध आहे.

एलिट फिचर्स – परिपूर्ण प्रीमियम अनुभव : Vivo V50 Elite Edition मध्ये १२GB रॅम आणि ५१२GB स्टोरेज आहे, जो वापरकर्त्यांना एक वेगवान आणि अखंड परफॉर्मन्स अनुभव देतो. यासोबत 6,000mAh क्षमतेची मोठी बॅटरी आणि 90W फ्लॅशचार्ज तंत्रज्ञान यामुळे स्लिम डिझाइन असूनही दीर्घकालीन बॅटरी बॅकअप मिळतो.

फोनमध्ये 6.78-इंच वक्र AMOLED डिस्प्ले असून 4,500 निट्स पर्यंत ब्राइटनेस देतो, ज्यामुळे सूर्यप्रकाशातही स्पष्ट दृश्य अनुभव मिळतो.

झीस कॅमेरा टेक्नॉलॉजीसह वधारलेली फोटोग्राफी : V50 Elite Edition मध्ये 50MP Zeiss ऑल-मेन कॅमेरा सिस्टम असून OIS, अल्ट्रा-वाइड आणि ग्रुप सेल्फी सुविधा पुरवली आहे. विशेष म्हणजे, यात भारत-विशेष वेडिंग पोर्ट्रेट स्टुडिओ, झीस पोर्ट्रेट स्टाईल्स आणि AI 3D स्टुडिओ लाइटिंग 2.0 समाविष्ट आहे, जे प्रीमियम पोर्ट्रेट अनुभवाला अधिक प्रगल्भ करतात.

डिझाईन आणि टिकाऊपणा यांचा उत्तम समन्वय : फोनला डायमंड शील्ड ग्लास, IP68/IP69 रेटिंग आणि पूर्ण कुशनिंग स्ट्रक्चर मिळाले आहे. त्यामुळे हा फोन ड्रॉप-प्रूफ आणि वॉटरप्रूफ आहे. Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसरद्वारे समर्थित, हा फोन ३ वर्षांचे OS अपडेट्स आणि ४ वर्षांचे सुरक्षा अपडेट्स प्रदान करतो.

AI अनुभव आणि इन-बॉक्स TWS 3E : AI-सक्षम वैशिष्ट्ये जसे की सर्कल टू सर्च, AI स्क्रीन ट्रान्सलेशन, AI ट्रान्सक्रिप्ट असिस्ट आणि AI इरेजर 2.0 वापरकर्त्यांचा अनुभव अधिक स्मार्ट बनवतात. याशिवाय, बॉक्समध्ये समाविष्ट असलेल्या Vivo TWS 3E Dark Indigo मध्ये 30dB ANC, 42-तासांची बॅटरी, 88ms लो-लेटंसी आणि IP54 रेटिंग आहे, ज्यामुळे संगीत आणि गेमिंग अनुभव अधिक उत्कृष्ठ बनतो.

ऑफर्स आणि सवलती : ऑनलाइन खरेदीवर HDFC, SBI आणि Axis बँक कार्डधारकांना ₹3000 पर्यंत कॅशबॅक किंवा एक्सचेंज बोनस आणि ६ महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI ची सुविधा मिळेल. ऑफलाइन खरेदीसाठी ₹3000 पर्यंत कॅशबॅक, शून्य डाऊन पेमेंटवर १० महिन्यांची EMI, Vivo V-अपग्रेड प्रोग्राम, आणि V-Shield डिव्हाइस प्रोटेक्शनचा समावेश आहे.
मेक इन इंडिया वचनबद्धता

Vivo V50 Elite Edition देखील विवोच्या ग्रेटर नोएडा प्लांटमध्ये तयार करण्यात आला असून, भारतात सुमारे ८,००० कामगारांना रोजगार देणाऱ्या या युनिटमधून उत्पादित केला गेलेला आहे. विवोने ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाशी आपली नाळ जुळवत भारतीय उत्पादनाला प्राधान्य दिले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now