Viral Video : नवरीची चेष्टा करणं नवरदेवाला पडलं महागात; स्टेजवरच पाडला अन् धू-धू धुतला

Viral Video : नवरीची चेष्टा करणं नवरदेवाला पडलं महागात; स्टेजवरच पाडला अन् धू-धू धुतला

नवी दिल्ली : नवरा-नवरीसाठी लग्नाचा क्षण फारच महत्त्वाचा असतो. या खास क्षणांची लोक वाट बघत असतात. परंतु लग्नकार्यात कधीकधी अशा घटना घडतात, त्याचा त्रास आयुष्यभर सहन करावा लागतो. एका विवाह सोहळ्यात एक धक्कादायक प्रकार घडला. याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

BIG NEWS : कोरोनाचा नवा विषाणू किती खतरनाक? भारतात पुन्हा कोव्हिडची लाट येणार? आरोग्य तज्ज्ञांचं मोठं भाकीत

वरमाळ घालतावेळी नवरदेवाने अशी चेष्टा केली की, नवरीला भयंकर राग आला. तिने त्याला उचलून आपटलं आणि दणके देण्यास सुरुवात केली. हा व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे.

BIG NEWS : राज्यातील मोठा राजकीय भूकंप? सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री, तर जयंत पाटील व रोहित पवार राज्यात मंत्री होणार?

लग्नाच्या मंचावर नवरी आपल्या होणाऱ्या नवऱ्याच्या पाया पडण्याचा प्रयत्न करत असते. परंतु चेष्टेच्या मूडमध्ये असलेला नवरदेव मागे-मागे उड्या घेतो. ती बिचारा पुन्हा पाय धरण्याचा प्रयत्न करत असते. शेवटी रागात आलेल्या नवरीने त्याचे पाय धरले आणि त्याला स्टेजवर आपटलं.

“The Dark History of Shaniwar Wada : The Truth Behind ‘Kaka Mala Vachva’”

स्टेजवर आपटलून त्याला रट्टे देण्यास सुरुवात केली. तर नवरदेवही लाथा घालून नवरीला मार देण्याचा प्रयत्न करीत होता. नवरीनेही चांगलाच हात साफ केला. लग्नाचा मंच काही वेळाच युद्धाचं मैदान झाल्याचा भास झाला. उपस्थित मात्र चांगलेच हैराण झाले असतील.

Shaniwar Wada Horror Story : “काका मला वाचवा” या आवाजामागील खरी कहाणी काय आहे?

व्हायरल व्हिडीओवर लोकांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींना हा व्हिडीओ फेक वाटतोय. तर काहींनी या व्हिडीओचा मनमुराद आनंद घेतला. काही लोक इतरांना सल्ला देत लग्नावेळी जास्त शहाणपणा करु नका, नाहीतर असा मार खावा लागेल, असं सांगत आहेत.

Kedal Jinson Case : आई, वडील, बहीण, आत्याला आत्म्याच्या नादात संपवलं, पण केरळमधल्या केसचं सत्य भलतंच