Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात नवा खुलासा – लग्नासाठी वडिलांवर लादलेल्या खर्चाचा धक्कादायक तपशील समोर

पुणे – वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) हुंडाबळी प्रकरणाने महाराष्ट्र हादरलेला असताना, आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. वैष्णवीच्या वडिलांकडून हगवणे कुटुंबाने लग्नासाठी प्रचंड खर्च करायला लावल्याचा खुलासा झाला आहे. एका आलिशान विवाहसोहळ्यासाठी कोट्यवधींचा खर्च केल्याची माहिती आता समोर आली असून, हगवणे कुटुंबाच्या हावरटपणावर पुन्हा एकदा बोट ठेवले जात आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी कारवाई; फरार आरोपीला मदत करणारे आणखी पाच जण ताब्यात; ते ५ जण कोण?

💰 लग्नासाठी लादलेला खर्च – तपशीलवार माहिती:

रिसॉर्टचे भाडे: विवाहासाठी बुक करण्यात आलेल्या रिसॉर्टचे भाडे तब्बल १० लाख रुपये होते.

स्टेज डेकोरेशन: केवळ सजावटीसाठी २२ लाखांचा खर्च करण्यात आला.

रिसेप्शन आणि जेवण: ५ हजार पाहुण्यांसाठी १००० रुपये प्लेटप्रमाणे ५० लाख रुपयांचे जेवण दिले गेले.

कपडे आणि पाहुण्यांचा सत्कार: लाखो रुपयांचा खर्च या बाबतीतही करण्यात आला. संपूर्ण आयोजन इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडे सोपवले गेले होते.

सोनं आणि चांदी: हुंड्याच्या स्वरूपात ५१ तोळे सोनं देण्यात आलं, ज्याची किंमत त्यावेळी सुमारे ३३ लाख रुपये होती. तसेच, लाखो रुपयांच्या चांदीच्या भांड्यांचा समावेशही होता.

आलिशान कार: वैष्णवीच्या वडिलांनी फॉर्च्युनर कार (किंमत सुमारे ४५ ते ६० लाख रुपये) जावयाला दिली होती.

आयफोन: लग्नानंतर सासऱ्यांकडून लेटेस्ट आयफोन मागवून घेतला गेला.

या सगळ्या खर्चाचा एकूण अंदाज सुमारे पावणे दोन कोटी रुपये इतका असून, एवढ्या प्रचंड खर्चानंतरही वैष्णवीवर सतत माहेरून पैसे आणण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता.

फॉर्च्युनर ४-५ वेळा उलटली, माजी आमदार यांचे निधन; महामार्गावर पाणी साचल्याने भीषण अपघात

😡 हुंडाप्रथेचा क्रूर चेहरा उजेडात

या सगळ्या प्रकारावरून हगवणे कुटुंबाचा खोटा प्रतिष्ठाभान आणि हुंड्याच्या हव्यासाने व्यापलेला वृत्ती स्पष्ट होत आहे. लग्नानंतरही नव्या नवरीकडून अपेक्षा, मागण्या आणि मानसिक त्रास दिला जात होता, याचे गंभीर पडसाद समाजात उमटत आहेत.

वैष्णवीच्या आत्महत्येनंतर सुरू असलेल्या तपासात आता हगवणे कुटुंबाचा खरा चेहरा समोर येत आहे. हुंड्यासाठी एका निष्पाप तरुणीचा बळी घेणाऱ्या या हावरट प्रवृत्तीचा सर्वत्र निषेध होत आहे. सामाजिक कुप्रथांविरोधात आता कठोर पावलं उचलण्याची गरज अधिक तीव्रतेने जाणवू लागली आहे.