Vaishnavi Hagawane Death Case : हगवणे कुटुंबाचा हादरवणारा नवा कांड, ‘ही’ एक गोष्ट मिळवण्यासाठी…काय डाव रचला?

By: Editor_Pratik

On: Wednesday, May 28, 2025 2:59 PM

hagawne
Google News
Follow Us

Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात तिच्या सासरच्या कुटुंबावर गंभीर आरोप झाले असून, संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, हगवणे कुटुंबाचे एकामागोमाग एक धक्कादायक कारनामे समोर येत आहेत. आता याच प्रकरणात पिस्तुल परवाना मिळवण्यासाठी त्यांनी खोटा पत्ता वापरल्याचे समोर आले आहे.

🔫 पिस्तुल परवाना मिळवण्यासाठी खोटा पत्ता

मिळालेल्या माहितीनुसार, शशांक आणि सुनील हगवणे या बंधूंनी 2022 साली पिस्तुलाचा परवाना मिळवण्यासाठी पोलिसांची दिशाभूल केली होती. खरं तर हे कुटुंब पुणे जिल्ह्यातील पौड भागात वास्तव्यास आहे, मात्र त्यांनी पुणे शहरातील भाड्याच्या घराचा बनावट पत्ता दाखवत पिस्तुलाचा परवाना मिळवला.

❗ निलेश चव्हाण आणि धमकीचा प्रकार

या प्रकरणात आणखी एक धक्का म्हणजे निलेश चव्हाण याला देखील याच काळात पिस्तुलाचा परवाना मिळाल्याची माहिती आहे. त्याने वैष्णवीच्या कुटुंबाला त्याच पिस्तुलाच्या धाकाने धमकावल्याचा आरोप आहे. त्यामुळे सध्या निलेश चव्हाणच्या पिस्तुल परवान्याचीही चौकशी सुरू असून, त्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

🚨 गुन्हा दाखल होण्याची शक्यता

खोट्या माहितीद्वारे शासकीय यंत्रणांची फसवणूक केल्याप्रकरणी हगवणे बंधूंवर स्वतंत्र गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच त्यांचा पिस्तुल परवाना रद्द करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे.

⚖️ हगवणे कुटुंबाच्या वकिलांचा वादग्रस्त युक्तिवाद

दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी सुरू असून, हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी कोर्टात केलेला युक्तिवादही वादग्रस्त ठरत आहे. त्यांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेतला असून, ती दुसऱ्या मुलासोबत संबंधात होती असा आरोप केला. इतकंच नव्हे तर वैष्णवीमध्ये आत्महत्या करण्याची प्रवृत्ती होती आणि तिने याआधी दोन वेळा प्रयत्न केल्याचा दावा वकिलांनी न्यायालयात केला आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now