‘द कल्याणी स्कूलचे’ सी.बी.एस.ई परीक्षेत यशस्वी प्रदर्शन; दहावी व बारावी दोन्हीमध्ये १००% निकाल!

By: Editor_Pratik

On: Wednesday, May 14, 2025 9:17 AM

Google News
Follow Us

‘द कल्याणी स्कूलचे’ सी.बी.एस.ई परीक्षेत यशस्वी प्रदर्शन; दहावी व बारावी दोन्हीमध्ये १००% निकाल!

पुणे, १४ मे २०२५ – पुण्यातील कल्याणी स्कूलने यंदाच्या सीबीएसई बोर्ड परीक्षांमध्ये दहावी व बारावीमध्ये १०० टक्के निकाल मिळवत उल्लेखनीय शिक्षणाची परंपरा जपली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीवर भर देणाऱ्या या शाळेच्या शैक्षणिक वाटचालीतील हे आणखी एक यशस्वी पर्व ठरले आहे.

बारावीच्या परीक्षेत एकूण ११७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, यामध्ये तब्बल ४५ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा अधिक गुण मिळवले. शाळेने नव्या शैक्षणिक धोरण्यानुसार पारंपरिक शाखा रचना दूर करत इंटरडिसिप्लिनरी अभ्यासक्रम राबविला आहे. त्यामुळे निकाल शाखानिहाय विभागण्यात आलेले नाहीत.

या वर्षीच्या टॉपर्समध्ये पुढील विद्यार्थ्यांचा समावेश आहे:

• मुग्धा फाटक – ९७.४%

• वाई. श्री लक्ष्मी मानसा – ९७.२%

• अनिश गंगावरम – ९६.६%

दहावीच्या परीक्षेत एकूण ११५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यामधून ७५ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवत उल्लेखनीय यश मिळवले आहे.
या गटातील टॉपर्स पुढीलप्रमाणे आहेत:

• अर्णव पक्कला – १००%

• सिया पियुष धगर – ९९.४%

• श्रेया कुडनूर – ९९%

• ईशा जैन – ९३% (दृष्टीदोष असूनही तिच्या प्रेरणादायी यशाला सर्वत्र दाद मिळत आहे!)

या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना शाळेच्या मुख्याध्यापिका मिसेस निर्मल वड्डन म्हणाल्या, “या उल्लेखनीय निकालांमागे केवळ विद्यार्थ्यांची मेहनतच नाही, तर आमच्या सर्व शिक्षकांचा सातत्यपूर्ण समर्पणभाव, आणि शिक्षणातील उत्कटता आहे. आमच्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, जिज्ञासा आणि मूल्यनिष्ठता रुजवण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत.”

शाळेच्या संचालिका मिस दीक्षा कल्याणी यांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना अभिनंदन दिले. “अशा प्रकारची सातत्याने मिळणारी शैक्षणिक गुणवत्ता ही आमच्या शाळेच्या ‘करुणेने प्रेरित महत्त्वाकांक्षा’ या तत्त्वज्ञानाला बळ देते,” असं त्यांनी नमूद केलं.

या यशामुळे शाळेमध्ये साजरा करण्याचा आनंददायी माहोल निर्माण झाला असून, द कल्याणी स्कूल ही पुण्यातील भविष्य-केंद्रित, आणि दर्जेदार शिक्षण देणारी अग्रगण्य संस्था म्हणून परत अधोरेखित झाली आहे.

अधिक माहितीसाठी – https://thekalyanischool.com/

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now