लोणी काळभोर : पेठगाव (ता. हवेली) येथील शिवारातील एका उघड्या पत्रा शेडमध्ये ६ अनोळखी इसम जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर उरुळी कांचन पोलिसांनी कारवाई करत एकूण ₹1,67,100 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. मात्र, पोलीसांची चाहूल लागताच आरोपींनी पळ काढला.
या प्रकरणी पोलीस नाईक सुमित नंदकुमार वाघ (ब.नं. 2982, उरुळी कांचन पोलीस स्टेशन) यांनी फिर्याद दिली आहे. यावरून महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) अंतर्गत गुन्हा रजि. नं. 161/2025 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईचा तपशील असा : ता. 24 मे 2025 रोजी सायंकाळी 5.30 च्या सुमारास दादा आढाव यांच्या शेतातील उघड्या पत्रा शेडमध्ये काही इसम जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार ता. 25 मे रोजी रात्री 1.25 वाजता पोलिसांनी छापा टाकला असता, तेथे ६ अनोळखी इसम रोख रक्कम व विविध साहित्याच्या साहाय्याने जुगार खेळताना आढळले. मात्र पोलिसांची चाहूल लागताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल :
₹1000/- रोख रक्कम
₹100/- किंमतीचे 52 पत्ते
₹2000/- लाकडी टेबल
₹1000/- प्लास्टिक टेबल
₹3000/- सहा प्लास्टिक खुर्च्या
₹1,60,000/- किंमतीच्या चार मोटारसायकली (हिरो स्प्लेंडर MH12 SW 5228, होंडा अॅक्टिवा MH12 RX 0624, हिरो पॅशन MH12 CX 7604, हिरो स्प्लेंडर MH12 TQ 1944)
एकूण जप्त मुद्देमालाची किंमत: ₹1,67,100/-
या गुन्ह्याचा पुढील तपास श्रे. पोसई खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, कारवाई पोहवा 1345 शेख यांनी केली. पोनि शंकर पाटील हे प्रकरणाचे प्रभारी अधिकारी आहेत.