Bibwewadi Crime : बिबवेवाडीत मध्यरात्री दहशत माजवणाऱ्या टोळक्यांचा बंदोबस्त; पोलिसांची धडक कारवाई, नागरिकांकडून टाळ्यांनी स्वागत

By: Editor_Pratik

On: Sunday, May 25, 2025 1:22 PM

bibewadi news
Google News
Follow Us

पुणे – बिबवेवाडी (Bibwewadi Crime) परिसरात मध्यरात्री हत्यारं घेऊन धुडगूस घालणाऱ्या टोळक्यांनी दरम्यानच्या काळात डोके वर काढले होते. मात्र बिबवेवाडी पोलिसांच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे या गुंडगिरीला आळा बसला आहे.

बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी तसेच तपास पथकाचे प्रमुख पीएसआय अशोक येवले यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी स्टाफने (गुप्त तपास पथक) केलेल्या धडक कारवाईत तब्बल २० हून अधिक हत्यारबंद गुंडांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्व टोळक्यांविरोधात वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये या टोळक्यांना हत्यारं घेऊन रस्त्यावर दहशत माजवताना आणि पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत तिथून हुसकावून लावतानाचे दृश्य स्पष्टपणे दिसत आहे.

ही कारवाई अत्यंत नियोजनबद्ध रितीने करण्यात आली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही एक महत्त्वपूर्ण पावले मानली जात आहेत. परिसरातील नागरिकांनी पोलिसांचे कौतुक करत टाळ्यांनी स्वागत केले. नागरिकांमध्ये नव्याने सुरक्षिततेचा विश्वास निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या टोळक्यांविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून, बिबवेवाडी परिसरात शांतता राखण्यासाठी पोलीस सतत गस्त वाढवणार आहेत.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now