BIG NEWS : राज्यातील मोठा राजकीय भूकंप? सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री, तर जयंत पाटील व रोहित पवार राज्यात मंत्री होणार?

By: Editor_Pratik

On: Monday, May 19, 2025 2:14 PM

jayant-patil-and-supriya-sule-og
Google News
Follow Us

BIG NEWS : राज्यातील मोठा राजकीय भूकंप? सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री, तर जयंत पाटील व रोहित पवार राज्यात मंत्री होणार?

पुणे, १९ मे २०२५ – राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना सध्या जोर चढला असताना, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात नवा भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

“The Dark History of Shaniwar Wada : The Truth Behind ‘Kaka Mala Vachva’”

हाके यांनी आज माध्यमांशी बोलताना दावा केला की, सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असून, जयंत पाटील आणि रोहित पवार लवकरच राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळवणार आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, “आज नाही तर उद्या हे तिघेही मंत्री होणार आहेत.”

Shaniwar Wada Horror Story : “काका मला वाचवा” या आवाजामागील खरी कहाणी काय आहे?

परंतु, हाके यांच्या मते, या घडामोडींमुळे ओबीसी नेत्यांचे राजकीय नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यांनी यावेळी भाजपवर टीका करत म्हटले की, गोपीचंद पडळकर (भाजप) आणि छगन भुजबळ (अजित पवार गट) यांचा वापर फक्त ओबीसी मतांसाठी केला जात आहे. “हे नेते भाजपसाठी फक्त मतदानाचे साधन बनले आहेत,” असा आरोप त्यांनी केला.

Kedal Jinson Case : आई, वडील, बहीण, आत्याला आत्म्याच्या नादात संपवलं, पण केरळमधल्या केसचं सत्य भलतंच

हाके यांनी आणखी एक धक्कादायक दावा करत सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोहित पवारांना मंत्रिमंडळात आणण्याच्या बाजूने नसले तरी, शरद पवार, अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयामुळे फडणवीस काही करू शकणार नाहीत. “गेल्या १० वर्षांत काका-पुतणे (शरद आणि रोहित पवार) वारंवार अमित शहांच्या दारात दिसले आहेत,” असा टोलाही त्यांनी लगावला.

सध्या केंद्रात राष्ट्रवादीला अजूनही मंत्रिपद मिळालेले नाही, तसेच राज्यात अजित पवार गटाकडे दोन मंत्रीपदे अजूनही रिक्त आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी एकत्र येण्याची शक्यता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला आली आहे.

शरद पवार वारंवार फुले, शाहू, आंबेडकर यांचा उल्लेख करत असले तरी, ते प्रत्यक्षात भाजप नेतृत्वाशीच जवळीक साधत असल्याचा आरोप हाके यांनी केला. “शरद पवारांनी कोणताही आव आणण्याच्या फंदात पडू नये,” असा इशाराही त्यांनी दिला.

सारांश: राज्यातील सत्तेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटांत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळे केंद्रात, तर जयंत पाटील आणि रोहित पवार राज्यात मंत्री होणार असल्याच्या चर्चांमुळे आगामी राजकीय समीकरणे कशी बदलतील, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now