Beauty Influencer वालेरिया मार्केजची थेट Live Streaming दरम्यान गोळ्या झाडून हत्या; Femicideचा संशय

By: Editor_Pratik

On: Monday, May 19, 2025 8:36 PM

Google News
Follow Us

Beauty Influencer वालेरिया मार्केजची थेट Live Streaming दरम्यान गोळ्या झाडून हत्या; Femicideचा संशय

मेक्सिको सिटी | मेक्सिकोमधील प्रसिद्ध 23 वर्षीय ब्यूटी इन्फ्लुएन्सर वालेरिया मार्केज हिची थेट लाइव्ह स्ट्रिमिंग करत असताना अज्ञात हल्लेखोराने गोळ्या घालून हत्या केली. सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेल्या वालेरियाच्या मृत्यूने तिच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

Live दरम्यान गोळीबार, व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल

ही थरारक घटना Blossom the Beauty Lounge या तिच्या सलूनमध्ये घडली. वालेरिया लाईव्ह करत असताना एक व्यक्ती तिच्याकडे आला आणि तिच्या कपाळावर व छातीत गोळ्या झाडल्या. या घटनेचा थरारक व्हिडिओ फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये वालेरिया आपल्या सहकाऱ्यांशी बोलताना दिसते आणि काही सेकंदांत गोळीबाराचा आवाज ऐकू येतो. तिने शेवटचं म्हटलं होतं, “ते येत आहेत…”

BIG NEWS : कोरोनाचा नवा विषाणू किती खतरनाक? भारतात पुन्हा कोव्हिडची लाट येणार? आरोग्य तज्ज्ञांचं मोठं भाकीत

हल्लेखोर गिफ्ट घेऊन आला होता, आधीच होते संशय

घटनेच्या काही वेळ आधीच वालेरियाने सांगितलं होतं की, सलूनमध्ये तिच्यासाठी एक महागडं गिफ्ट घेऊन एक व्यक्ती आला होता. तिने त्या व्यक्तीबद्दल संशय व्यक्त करत, “मी त्याची वाट पाहत नाही,” असं म्हटलं होतं. त्यामुळे पोलिसांचा संशय आहे की, गिफ्टच्या बहाण्याने तो आरोपी तिथे पोहोचला आणि तिने ओळख न घेताच गोळीबार केला.

BIG NEWS : राज्यातील मोठा राजकीय भूकंप? सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री, तर जयंत पाटील व रोहित पवार राज्यात मंत्री होणार?


कोणताही वैयक्तिक वाद नव्हता, ‘Femicide’चा संशय

पोलिस तपासात अद्याप कोणताही वैयक्तिक वाद, पूर्वीचे मतभेद अथवा वैर समोर आलेले नाही. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांचा कल आहे की, ही घटना ‘Femicide’ म्हणजे स्त्रीविरोधी द्वेषातून केलेली हत्या असू शकते. म्हणजे केवळ ती स्त्री आहे म्हणून तिच्यावर हल्ला झाला असावा.

“The Dark History of Shaniwar Wada : The Truth Behind ‘Kaka Mala Vachva’”


मेक्सिकोत स्त्रियांवरील हिंसाचार चिंतेचा विषय

वालेरियाची हत्या ही मेक्सिकोतील स्त्रियांच्या वाढत्या हत्यांमध्ये आणखी एक भर आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार, मेक्सिकोमध्ये दररोज 10-11 महिलांची हत्या होते. 2001 ते 2024 या कालावधीत 50,000 पेक्षा अधिक महिलांची हत्या झाल्याचे उघड झाले आहे.

Shaniwar Wada Horror Story : “काका मला वाचवा” या आवाजामागील खरी कहाणी काय आहे?

फक्त मेक्सिकोच नाही, तर लॅटिन अमेरिका, पॅराग्वे, उरुग्वे, बोलिव्हिया या देशांतही महिलांवरील हत्यांचं प्रमाण वाढत चाललं आहे. यावर संयुक्त राष्ट्रसंघानेही गंभीर चिंता व्यक्त केली आहे.


वालेरिया मार्केजच्या हत्या प्रकरणाने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. सोशल मीडियावर दिसणारी प्रसिद्धी, ग्लॅमर आणि यश यामागे लपलेला धोका आता अधिक स्पष्टपणे समोर येतो आहे. सरकारने या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून, महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

September 23, 2026

September 22, 2026

September 20, 2026

September 15, 2026

September 12, 2026

September 4, 2026