सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव २०२५ फोंडा, गोवा

By: Editor _2

On: Friday, May 23, 2025 2:51 PM

Google News
Follow Us

‘सनातन शंखनाद महोत्सवात’ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी मावळ्यांचे वंशज सहभागी!

सहभागी मावळ्यांच्या वंशजांनी घेतली अनेक संतांची आणि हिंदुत्वनिष्ठांची भेट !

फोंडा, गोवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेनगरी ): फोंडा येथे १७ ते १९ मे दरम्यान पार पडलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी मावळे सरसेनापती येसाजी कंक याचे १३ वे वंशज रविंद्र कंक, दत्तात्रय कंक, हिंदवी स्वराज्याचे स्थापत्यशास्त्रज्ञ हिरोजी इंदलकर यांचे वशंज श्रीनिवास इंदलकर, कान्होजी जेधे यांचे वंशज युवराज जेधे हे सहभागी झाले होते. मावळ्यांचे वंशज रवींद्र कंक यांनी अयोध्या येथील सिद्धपीठ हनुमान गढी मंदिराचे महंत श्री राजूदासजी महाराज यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला तसेच भाग्यनगर येथील हिंदुत्वनिष्ठ विधायक श्री. राजा सिंग ठाकूर यांच्याही भेट घेतली.

      रविंद्र कंक म्हणाले देशातून व परदेशातून २५ सहस्रहुन अधिक साधक आणि धर्मप्रेमी या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमातून संत, महंत यांचा सहवास आणि अनमोल मार्गदर्शनाचा लाभ होत आहे.हिंदू धर्मासाठी कार्य करणाऱ्या विविध संघटना याठिकाणी भारत हिंदू राष्ट्र व्हावे यासाठी एका विचाराने प्रेरित होऊन या ठिकाणी एकत्र आलेल्या आहेत. त्यामुळे आता हिंदू राष्ट्र होणारच आहे अशी माझी खात्री आहे.

       शिवकालीन ऐतिहासिक आणि दुर्मिळ शस्त्र प्रदर्शनात सरदार येसाजी कंक यांची तलवार आणि सरदार कान्होजी जेधे यांचे चिलखत प्रमुख आकर्षण ठरले.

  प्रदर्शनात शिवकालीन युद्धकलेत वापरण्यात येणारी दुर्मिळ शस्त्रे, विविध प्रकारच्या तलवारी, बंदुका, ढाली, जांबिया, तोफा, कट्यारी, चिलखत, शिरस्त्राण, भाले, कुर्‍हाडी, त्रिशूल, अंकुश, सिकल, पुरबा इत्यादींचे प्रदर्शन लावण्यात आले होते.यामध्ये मावळ्यांच्या वंशजांनी आणलेली सरदार येसाजी कंक यांची तलवार आणि सरदार कान्होजी जेधे यांचे चिलखत हे प्रमुख आकर्षण ठरले.याशिवाय छत्रपतींच्या सैन्यातील सरदारांची सचित्र पराक्रमाची माहितीही उपस्थितांना इतिहासाचे प्रत्यक्ष दर्शन घडवणारी ठरली.

Jedhe Yanchi Talvar 

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now