सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव!

‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवात ‘पद्मश्री’प्रमाणे ४ जणांना ‘हिंदु राष्ट्ररत्न’ व २० जणांना ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार!
* हिंदु राष्ट्ररत्न : आचार्य गणेश्वर शास्त्री द्रविड, डॉ. सच्चिदानंद शेवडे;
* सनातन धर्मश्री : आमदार टी. राजा सिंह, अधिवक्ता विष्णु जैन, प्रमोद मुतालिक

     फोंडागोवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉआठवलेनगरी) – सनातन संस्थेच्या वतीने आयोजित ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवात हिंदु धर्मजागृती आणि राष्ट्ररक्षणासाठी कार्य करणार्‍या व्यक्तींना सन्मानित करण्यात आलेसनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉजयंत बाळाजी आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या शुभहस्ते हस्ते ४ जणांना ‘हिंदु राष्ट्ररत्न’तर २० जणांना ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेया वेळी कार्यक्रमाला २३ देशांतील २० हजारांहून अधिक साधक आणि हिंदू धर्मप्रेमी उपस्थित होतेया प्रसंगी व्यासपीठावर सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉआठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती होती.

      या प्रसंगी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्रीचेतन राजहंस म्हणाले, “देशात विविध क्षेत्रांतील कार्यकर्त्यांना ‘पद्म’ ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मविभूषण’ पुरस्कार दिले जातातमात्र हिंदु धर्मासाठी जीवन समर्पित करून कार्य करणार्‍यांना अद्याप कोणताही सन्मान दिला जात नाहीही पोकळी भरून काढण्यासाठी सनातन संस्थेने हा पुरस्कार आरंभला आहेसच्चिदानंद परब्रह्म डॉआठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी हे पुरस्कार दिले जातील.”

                                   

     उत्तरप्रदेश येथील आचार्य गणेश्वर शास्त्री द्रविडबांगलादेश येथील ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे संस्थापक पूअधिवक्ता रवींद्र घोषकर्नाटक येथील पंचशिल्पकार पूकाशीनाथ कवटेकरमहाराष्ट्रातील मुंबई येथील प्रख्यात प्रवचनकार डॉसच्चिदानंद शेवडेयांना ‘हिंदु राष्ट्ररत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

           

     तर ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित करणार्‍यांमध्ये भाग्यनगर येथील हिंदुत्वनिष्ठ आमदार टीराजा सिंहकाशीमथुरा येथील मंदिरमुक्तीसाठी लढा देणारे सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु जैनगोवा येथील घनपाठी आचार्य योगेश्वर बोरकरगोवा येथील पंडित महामहोपाध्याय डॉदेवदत्त पाटीलजीकर्नाटक येथील श्रीराम सेनेचे संस्थापक श्रीप्रमोद मुतालिककर्नाटक येथील ‘युवा बिग्रेड’चे मार्गदर्शक श्रीचक्रवर्ती सुलीबेलेदिल्ली येथील चाणक्य फोरमचे संपादक मेजर गौरव आर्यजीदिल्ली येथील ‘सुदर्शन वाहिनी’चे प्रधान संपादक डॉसुरेश चव्हाणकेउत्तर प्रदेश येथील ‘प्राच्यम्’चे संस्थापक कॅप्टन प्रवीण चतुर्वेदीतामिळनाडू येथील हिंदू मक्कल कत्छी’चे संस्थापक श्रीअर्जुन संपथदिल्ली येथील ‘सेव कल्चर सेव भारत फाऊंडेशन’चे श्रीउदय माहुरकरकर्नाटक येथील माजी अतिरिक्त महाअधिवक्ता अधिवक्ता अरुण श्यामजीबेल्जियम येथील लेखक डॉकोएनराड एल्स्टओडीसा येथील ‘इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट ॲण्ड कल्चरल हेरिटेज’चे श्रीअनिलकुमार धीरदिल्ली येथील अग्नि समाजा’चे संस्थापक श्रीसंजीव नेवरदिल्ली येथील ‘सरयु ट्रस्ट’चे संस्थापक श्रीराहुण दिवाणहरियाणा येथील विचारवंत श्रीनीरज अत्रीमुंबई येथील समाजसेवक तथा लेखक डॉअमित थडानीइंडोनेशिया येथील ‘धर्मस्थापनम्’ फाऊंडेशनचे रस आचार्य पूधर्मयशजी महाराज आणि छत्तीसगड येथील श्रीप्रबल प्रतापसिंग जुदेव यांचा समावेश आहे.