सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात पुण्यातील राजकीय तसेच आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग !

फोंडा, गोवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले नगरी) – सनातन संस्थेच्या वतीने फर्मागुडी, फोंडा, गोवा येथे आयोजित सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात पुणे व पिंपरी-चिंचवड भागातून राजकीय तसेच आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले आहेत. पिंपरी चिंचवड शहर भाजपचे सरचिटणीस श्री विलास मडगिरी आणि श्री. क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त श्री.ओंकार देव व अन्य 4 सहकारी यांनीही उस्फूर्त सहभाग घेतला.


महोत्सवामध्ये श्री.ओंकार देव यांनी अनेक मंदिर ट्रस्टी, हिंदुत्वनिष्ठ यांच्याशी भेट घेतली तसेच येथे असणाऱ्या सनातन निर्मित ग्रंथ, सात्विक उत्पादने, संतांच्या पावन पादुका कक्ष, एक हजार वर्षांपूर्वीचे सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन कक्ष इ. ठिकाणी भेट दिली व दर्शन घेतांना तेथील पुजाऱ्याशी पण ज्योतिर्लिंगा बद्दल चर्चा केली. संपूर्ण महोत्सवाचे अत्यंत उत्कृष्ट नियोजन सनातनच्या साधकांनी केलेले आहे. सनातन राष्ट्र स्थापन करण्यासाठी हिंदुना एकजूट करणे का आवश्यक आहे हे या महोत्सवात आल्यावर लक्षात येते असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
शिवकालीन ऐतिहासिक शस्त्रप्रदर्शनाला भेट देताना पुण्यातील पिंपरी चिंचवड शहर भाजपचे सरचिटणीस श्री विलास हनुमंतराव मडगिरी यांनी हा उत्सव म्हणजे हिंदुराष्ट्राची एक प्रकारे सुरुवातच आहे, नव्या पिढीला एक प्रकारे शिव-शंभुचे विचार पोहचवण्याचे काम या महोत्सवातून होणार आहे असे त्यांनी सांगितले.

आपले नम्र

प्रा.विठ्ठल जाधव
सनातन संस्थेकरिता

(संपर्क 7038713883)