सीडीएसएल आयपीएफकडून महिलांना त्यांचा गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरता सई गोडबोले यांच्या आवाजात ‘बनो मिस आत्मनिर्भर इन्व्हेस्टर’ हे गीत सादर

By: Editor_Manas

On: Wednesday, June 24, 2026 5:52 PM

Google News
Follow Us

मुंबई, जून : सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड (आयपीएफ) ने आपल्या सुरू असलेल्या ‘आत्मनिर्भर’ (AtmanirbHER) उपक्रमांतर्गत लोकप्रिय गायिका, अभिनेत्री आणि कंटेंट क्रिएटर सई गोडबोले यांच्या आवाजातील ‘बनो मिस आत्मनिर्भर इन्व्हेस्टर’ हे नवीन गुंतवणूकदार जनजागृती गीत सादर केले आहे. हे गीत महिलांना सिक्युरिटीज मार्केटमध्ये सहभागी होण्यासाठी पहिले पाऊल उचलण्यास आणि आत्मविश्वासपूर्ण, माहितीपूर्ण तसेच स्वावलंबी, आत्मनिर्भर गुंतवणूकदार बनण्यास प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे.

हे गीत एका आकर्षक दृकश्राव्य चित्रफितीद्वारे साकारण्यात आले असून, त्यामध्ये एका महिलेच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे उलगडण्यात आले आहेत. पहिली नोकरी सुरू करण्यापासून नव्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यापर्यंत आणि स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्याच्या प्रवासापर्यंतचा हा प्रवास दाखवताना प्रत्येक महत्त्वपूर्ण यशाची सुरुवात संकोचावर मात करून पहिले पाऊल उचलण्यापासूनच होते हा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. गुंतवणुकीच्या प्रवासाशी समांतर चालत ही चित्रफीत महिलांना संशोधन, नियोजन आणि माहितीपूर्ण निर्णयांच्या आधारावर त्याच आत्मविश्वासाने गुंतवणुकीकडे पाहण्यास प्रोत्साहित करते. संपत्ती निर्माण करणारी, भविष्य घडवणारी आणि ध्येय गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारी व्यक्ती बनण्याचा संदेश देत हे गीत महिलांना त्यांच्या आर्थिक भवितव्याची जबाबदारी स्वीकारण्यास आणि आत्मनिर्भर गुंतवणूकदार बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू करण्यासाठी प्रेरित करते.

आज भारतातील जवळपास प्रत्येक चार गुंतवणूकदारांपैकी एक महिला आहे. देशातील गुंतवणूक क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग यातून दिसून येतो. कार्यक्षेत्रातील महिलांचा वाढता सहभाग आणि समाजातील त्यांची विकसित होत असलेली भूमिका लक्षात घेता अधिकाधिक महिला त्यांच्या आर्थिक निर्णयांवर स्वतःचे नियंत्रण प्रस्थापित करत आहेत. यामुळे भारतातील गुंतवणूकदारांच्या लोकसंख्याशास्त्रीय स्वरूपातही लक्षणीय बदल घडून येत आहे. सई गोडबोले यांचा वैशिष्ट्यपूर्ण आवाज आणि सहज आपलेसे वाटणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या माध्यमातून हे गीत विविध वयोगटांतील महिलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते आणि त्यांना आत्मविश्वास, जागरूकता तसेच माहितीपूर्ण निर्णयक्षमतेसह गुंतवणुकीकडे वळण्यासाठी प्रेरित करते.

अलीकडील वर्षांमध्ये गुंतवणुकीमधील महिलांचा सहभाग सातत्याने वाढला असला तरी या सहभागाला आणखी चालना देण्याची मोठी संधी अद्याप उपलब्ध आहे. जागरूकता, आत्मविश्वास, गुंतवणूक उत्पादनांविषयीची समज आणि विश्वासार्ह माहितीची उपलब्धता हे घटक सिक्युरिटीज मार्केटमधील माहितीपूर्ण सहभागासाठी आजही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

या उपक्रमाविषयी बोलताना सीडीएसएल आयपीएफ सचिवालय प्रमुख श्री. सुधीश पिल्लई म्हणाले, “‘बनो मिस आत्मनिर्भर इन्व्हेस्टर’ हे गीत एका साध्या पण प्रभावी संदेशावर आधारित आहे. प्रत्येक अर्थपूर्ण प्रवासाची सुरुवात पहिलं पाऊल उचलण्यापासून होते. या उपक्रमाद्वारे आम्हाला अधिकाधिक महिलांना गुंतवणुकीच्या दिशेने ते पहिले पाऊल उचलण्यासाठी प्रोत्साहित करायचे आहे, ज्ञानाच्या माध्यमातून त्यांचा आत्मविश्वास वाढवायचा आहे आणि त्यांना माहितीपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यास सक्षम करायचे आहे. महिला त्यांच्या आर्थिक भवितव्याची जबाबदारी अधिकाधिक प्रमाणात स्वीकारत असताना, त्या केवळ स्वतःच्या दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेलाच बळकटी देत नाहीत, तर अधिक सर्वसमावेशक आणि सक्षम गुंतवणूक परिसंस्था उभारण्यातही महत्त्वपूर्ण योगदान देतात.”

सीडीएसएल आयपीएफ विविध समाज घटकांमध्ये आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूकदार जागरूकता वाढविण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. ‘आत्मनिर्भर’ (AtmanirbHER) हा उपक्रम विविध पार्श्वभूमीतील महिलांना सिक्युरिटीज मार्केटमध्ये जबाबदारीने सहभागी होण्यासाठी आणि दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितता निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

July 14, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026

July 11, 2026

July 9, 2026