USsquare Media and Publicity : पुण्याची श्रुती प्रविण ‘सुपरमॉडेल २०२५’ स्पर्धेची फायनलिस्ट ठरली

USsquare Media and Publicity : पुण्याची श्रुती प्रविण ‘सुपरमॉडेल २०२५’ स्पर्धेची फायनलिस्ट ठरली

पुणे : पुण्यातील श्रुती प्रविण यांची ‘सुपरमॉडेल २०२५’ या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित सौंदर्यस्पर्धेसाठी फायनलिस्ट म्हणून निवड झाली असून, या यशाने पुणेकरांचे नाव रोशन केले आहे. मॉडेलिंगच्या क्षेत्रात अलीकडेच पदार्पण केलेल्या श्रुतीसाठी ही निवड एक मोठं पाऊल असून, त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास अनेक तरुणींना सृजनशीलता आणि व्यावसायिकता यांचा समतोल साधण्याचे बळ देणारा ठरत आहे.

श्रुती मूळच्या केरळ राज्यातील मल्लपूरम जिल्ह्याच्या असल्या तरी त्यांचा जन्म आणि संगोपन पुण्यातच झाला आहे. त्यांनी सेंट मिरा कॉलेज फॉर गर्ल्स, पुणे येथून एम.कॉम (बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन) या शाखेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या त्या एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत (MNC) पूर्ण वेळ नोकरी करत आहेत.

स्वयंसेवा, चित्रकला, स्वयंपाक, फोटोग्राफी, बागकाम, कविता, कथा व कोट लेखन अशा विविध छंदांमध्ये रस असलेल्या श्रुती यांनी USsquare मीडिया अँड पब्लिसिटीसोबत मॉडेलिंग क्षेत्रात सुरुवात केली असून, त्यांनी आपल्या सृजनशीलतेचा व्यावसायिक आयुष्यातही उत्तम उपयोग केला आहे.

या यशामागे सतत प्रोत्साहन देणाऱ्या आणि योग्य दिशादर्शन करणाऱ्या उद्धव खराड सरांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत. तसेच, भविष्यात अधिक संधी मिळाव्यात अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

त्यांच्या काही विशेष उपलब्धींमध्ये २०१९–२० मध्ये ‘यंग रिसर्चर्स’ जर्नलमध्ये संशोधन प्रबंध प्रसिद्ध होणे, एनएसएसच्या उपक्रमात सहभाग, तसेच मासिक पाळी आरोग्य व स्वच्छतेसाठी कार्यरत स्फेरुल फाउंडेशनमध्ये सक्रिय सहभाग यांचा समावेश आहे.

श्रुती प्रविण यांचा हा प्रवास आधुनिक तरुणींना प्रेरणा देणारा ठरतो, जो करिअर आणि छंद यांच्यात समतोल राखत नव्या संधींचा पाठपुरावा कसा करावा, याचा आदर्श आहे.

🔥 Follow this link to join WhatsApp group : 🔥

https://chat.whatsapp.com/KwUuP6pbQBfL3esGdSpWi0