USsquare Media and Publicity : नूतन राकेश राणे ‘पुणे सुपरमॉडेल २०२५’ मध्ये फायनलिस्ट ठरल्या!

By: Editor_Pratik

On: Monday, April 28, 2025 5:45 AM

Google News
Follow Us

USsquare Media and Publicity : नूतन राकेश राणे ‘पुणे सुपरमॉडेल २०२५’ मध्ये फायनलिस्ट ठरल्या!

पुणे : नूतन राकेश राणे या पुण्याच्या अत्यंत यशस्वी बिझनेस वूमन, ब्युटीशियन आणि इंटरनॅशनल सर्टिफायड मेकअप आर्टिस्ट, ‘पुणे सुपरमॉडेल २०२५’ या स्पर्धेत फायनलिस्ट ठरल्या आहेत. मागील १७ वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत असलेल्या नूतन राणे या एक प्रोफेशनल मॉडेल सुद्धा आहेत.

नूतन यांनी सुप्रसिद्ध मराठी अभिनेते अभिजीत खांडकेकर सरांसोबत २०२५ च्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरसाठी फोटोज शूट केले असून, डिझायनर साडी ब्रँड आणि मलबार गोल्ड ब्रँडसाठी वाशी, ठाणे येथे ज्वेलरी शूट देखील केले आहे.

“प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पायावर उभं राहून जीवनात यशस्वी व्हावं, हा माझा विश्वास आहे,” असं त्या अभिमानाने सांगतात. त्यांना वेगवेगळ्या पेहरावांबरोबरच दागिन्यांचीही विशेष आवड असून, यामुळेच त्यांनी मॉडलिंग क्षेत्रात पाऊल ठेवलं.

त्यांना इंस्टाग्रामवरील उद्धव खराड सर यांचे ‘यू एस स्क्वेअर मीडिया’ हे अकाउंट आणि यूट्यूबवरील त्यांच्या कार्यक्रमांचे आकर्षण वाटले. या क्षेत्रात रस असलेल्या व्यक्तींना त्यांनी दिलेल्या संधी अत्यंत प्रेरणादायक आहेत, असं नूतन म्हणाल्या.

याच प्रेरणेने त्या ‘सुपरमॉडेल’ स्पर्धेत सहभागी झाल्या आणि आता फायनलिस्ट म्हणून पुढील प्रवासासाठी सज्ज आहेत. त्यांना चित्रपटसृष्टीतही काम करण्याची मोठी इच्छा असून, त्या दृष्टीने त्या पुढे पावले टाकत आहेत.

हा शो पुण्यात होणार असून, नूतन राणे यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

🔥 Follow this link to join WhatsApp group : 🔥

https://chat.whatsapp.com/KwUuP6pbQBfL3esGdSpWi0

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now