साप्ताहिक नोंदणीवर दैनिक वृत्तपत्रांचे बिनधास्त प्रकाशन; नियमबाह्य प्रकारांना ऊत

By: Editor_Pratik

On: Sunday, April 27, 2025 9:31 AM

Google News
Follow Us

साप्ताहिक नोंदणीवर दैनिक वृत्तपत्रांचे बिनधास्त प्रकाशन; नियमबाह्य प्रकारांना ऊत

पुणे : राज्यात साप्ताहिक वृत्तपत्रासाठी घेतलेल्या नोंदणीच्या आधारे काही प्रकाशकांनी दररोज वृत्तपत्र छापण्याचा प्रकार सर्रास सुरू केला आहे. मुद्रण व प्रकाशन कायद्याचे आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करत काही मंडळी साप्ताहिक परवान्यावर दैनिक वृत्तपत्र चालवत असल्याचे समोर आले आहे.

दैनिक वृत्तपत्र चालवण्यासाठी विशिष्ट निकष अनिवार्य आहेत – जसे की, स्वतंत्र दैनिक नोंदणी, नियमित मुद्रण तपशीलांची नोंद, नियोजित कर्मचारी संख्या, प्रसारणाचा तपशील इत्यादी. तसेच दैनिक प्रकाशित करण्यासाठी रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स फॉर इंडिया (RNI) कडून स्वतंत्र मान्यता घ्यावी लागते. मात्र या प्रक्रियेला बगल देत काही साप्ताहिक प्रकाशक दररोज अंक प्रसिद्ध करत आहेत.

गंभीर मुद्दे :

  • साप्ताहिक रजिस्ट्रेशन असूनही ‘दैनिक’ असा लोगो वापरणे हे वाचकांची दिशाभूल करणारे आहे.
  • आर्थिक अनियमितता आणि जाहिरात धोरणात गैरप्रकार होण्याची शक्यता वाढते.
  • अधिकृत दैनिकांसाठी लागू असलेल्या जबाबदाऱ्या आणि पारदर्शकतेच्या निकषांपासून अशी माध्यमे दूर राहत असल्याने स्पर्धा बिघडते.
  • काही ठिकाणी स्थानिक यंत्रणांनाही याबाबतची माहिती असूनही कारवाई होत नाही, असा आरोप पत्रकार संघटनांनी केला आहे.

पत्रकार संघटनांची मागणी : या प्रकारांना आळा घालण्यासाठी साप्ताहिक नोंदणी असलेल्या वृत्तपत्रांची तपासणी करून जर ती दैनिक स्वरूपात सुरू असल्याचे आढळले, तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी विविध पत्रकार संघटनांकडून केली जात आहे.

पुण्यात बनावट फॅशन इव्हेंटचा सुळसुळाट; पैसे घेऊन अनेक तरूण-तरुणींचा मानसिक छळ; आयोजकांचे अनेक कारनामे ‘पुणे प्रहार’ करणार उघड

यामुळे प्रामाणिकपणे कार्यरत असलेल्या दैनिक वृत्तपत्रांना अन्यायकारक स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे, असा आरोपही करण्यात आला आहे.

WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

सद्यस्थितीत काही ठिकाणी माहिती व जनसंपर्क विभाग आणि RNIने संयुक्तपणे कारवाई सुरू केल्याची माहिती आहे. मात्र व्यापक पातळीवर नियमित तपासणी आणि कठोर कारवाई होईपर्यंत हा गैरप्रकार थांबणार नाही, अशी भावना माध्यम क्षेत्रात व्यक्त होत आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now