SIM CARD NEWS : काय तुम्ही देखील रस्त्यावरून सिमकार्ड घेताय? मग ही बातमी तुमच्यासाठी…

By: Editor_Pratik

On: Saturday, April 26, 2025 4:32 AM

SIM CARD NEWS
Google News
Follow Us

SIM CARD NEWS : काय तुम्ही देखील रस्त्यावरून सिमकार्ड घेताय? मग ही बातमी तुमच्यासाठी…

पुणे : शहरातील विविध रस्त्यांवर, चौकांमध्ये किंवा बसस्थानकांसमोर छत्री लावून सिमकार्ड विकणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आकर्षक ऑफर्स, मोफत डाटा, मिनिटं आणि सहज उपलब्धता याच्या नावाखाली अनेकजण त्यांच्याकडून सिमकार्ड खरेदी करत आहेत. मात्र, या अनधिकृत विक्रेत्यांकडून सिम घेणे म्हणजे स्वतःच्या सुरक्षिततेशी खेळ करण्यासारखे आहे.

सुरक्षा यंत्रणांचेही लक्ष वेधले अनेक प्रकरणांमध्ये अशा सिमकार्डचा वापर फसवणूक, सायबर क्राइम किंवा बनावट ओळखींसाठी झाल्याचे समोर आले आहे. सिम अ‍ॅक्टिव्ह करताना खरी केवायसी (KYC) प्रक्रिया पार पाडली जाते की नाही, याबाबत शंका असते. काहीवेळा ग्राहकाच्या नकळत त्याच्या नावावर अनेक सिमकार्ड अ‍ॅक्टिव्ह होतात आणि त्याचा गैरवापर होतो.

SIM CARD NEWS

तज्ज्ञांचा इशारा सायबर तज्ज्ञ आणि दूरसंचार क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी नागरिकांना अशा रस्त्यावरच्या अनधिकृत विक्रेत्यांकडून सिम खरेदी न करण्याचा इशारा दिला आहे. कोणतंही सिमकार्ड घ्यायचं असल्यास संबंधित कंपनीच्या अधिकृत स्टोअरमध्ये जाऊनच घ्यावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

नागरिकांनी जागरूक राहावे स्वतःची ओळख, बँकिंग माहिती आणि डिजिटल व्यवहार सुरक्षित ठेवायचे असतील तर मोबाईल नंबरची खरी खात्री असणं अत्यावश्यक आहे. थोडा वेळ जास्त लागला, थोडे पैसे खर्च झाले तरी अधिकृत आणि सुरक्षित सिम घेणं हेच शहाणपणाचं पाऊल ठरेल.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now