राजकारणात खळबळ : शरद पवार-अजित पवार यांच्यात एकत्रित बैठक
राज्याच्या राजकारणात दोन महत्वाच्या बातम्या आहेत. ठाकरे कुटुंबातील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्याचवेळी पवार कुटुंबातील शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बैठक सुरु आहे. एआयची बैठक संपल्यावर शरद पवार आणि अजित पवार या दोघांची एकत्रित बैठक सुरु झाली. शरद पवार यांच्या केबिनमध्ये अजित पवार गेले. त्यानंतर त्यांच्यात चर्चा सुरु झाली. दोन्ही नेत्यांमध्ये २० मिनिटे चर्चा झाली.
पुण्यातील साखर संकुलातील बैठक संपल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बैठक सुरु झाली. साखर संकुलात कृषी क्षेत्रात एआयच्या वापराबाबत बैठक होती. एक तास ही बैठक झाली. ही बैठक संपल्यावर शरद पवार आपल्या कॅबिनमध्ये गेले. त्यानंतर अजित पवार त्या बैठकीत गेले. दोन्ही नेत्यांमध्ये २० मिनिटे चर्चा झाली. त्या बैठकीला दोन अधिकारी उपस्थित होते. ही बैठक कशासाठी होती? त्याची माहिती मिळाली नाही. गेल्या पंधरा दिवसांत शरद पवार आणि अजित पवार हे चौथ्यांदा एकत्र आले.
काही दिवसांपूर्वी रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले होते. त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाला होता. काही दिवसांपूर्वी वसंतदादा इंस्टीट्यूटमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. तसेच जय पवार यांचा साखरपुडा पुण्यात झाला होता. त्यावेळी अजित पवार हे शरद पवार यांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारापर्यंत गेले होते. त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाला होता. त्यामुळे काका-पुतणे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. विषय एआयचा असला तरी दोन्ही नेत्यांमध्ये त्या माध्यमातून पवार कुटुंब एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु झाली. कारण पंधरा दिवसांत दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही चौथी बैठक आहे.
शरद पवार आणि अजित पवार यांच्यात सुरु असलेल्या बैठका राज्यातील राजकारणाचे भविष्याचे संकेत देत आहेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये सोमवारी झालेली बैठक महत्वाची आहे. बैठक संपल्यानंतर शरद पवार मोदी बागेकडे निघाले. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. सर्व पक्षांनी, सर्व कुटुंबियांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप, काँग्रेसचे निष्ठावंत बडे नेते भाजपाच्या वाटेवर, पक्ष सोडण्याचे कारण…
BIG NEWS : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल; ‘राज ठाकरेंचं वर्तन तालिबानी पद्धतीचं’
लाडकी बहीण योजना : एप्रिलचा हप्ता १५०० रुपये मिळणार की फक्त ५००? जाणून घ्या सविस्तर माहिती!
अश्लील फोटो, शारीरिक संबंध… संजय बांगर यांच्या मुलीचा भारतीय क्रिकेटपटूवर खळबळजनक आरोप!