फिनिक्स मार्केटसिटी, पुणे घेऊन आले आहे प्रीहिस्टोरिक अ‍ॅडव्हेंचर – डायनासोर वर्ल्ड.

या उन्हाळ्यात, फिनिक्स मार्केटसिटीचा मोस्ट अवेटेड इव्हेंट – हॉलिडे लँड आता डायनासोर वर्ल्डच्या माध्यमातून तुम्हाला घेऊन जाणार आहे एका थरारक प्राचीन दुनियेच्या प्रवासावर.. 11 एप्रिल ते 04 मे 2025 दरम्यान लिबर्टी स्क्वेअर येथे हा इव्हेंट होणार आहे. हा अविश्वसनीय अनुभव मुलांसाठी आणि कुटुंबांसाठी मौजमस्ती, माहिती आणि अ‍ॅडव्हेंचरची मेजवानी घेऊन येणार आहे.

प्रीहिस्टोरिक जायंट्स पहा अगदी जवळून

डायनासोर वर्ल्ड मध्ये मेसोजोइक युगातील जादू पुन्हा जिवंत केली गेली आहे- ज्यामध्ये टी-रेक्स, ब्रॅकिओसॉरस आणि प्टेरोडॅक्टिल्ससारखे आयकॉनिक डायनासोरस त्यांच्या खऱ्याखुऱ्या आकारामध्ये बघायला मिळणार आहेत. लिबर्टी स्क्वेअर एका प्राचीन जंगलात रूपांतरित झालं आहे जिथे खरेखुरे डरकाळीचे आवाज, सेन्सरवर चालणारे प्राणी आणि संपूर्ण थीमच तुमचा अनुभव अधिक जिवंत आणि थरारक बनवतो.

डायनासोरपेक्षा अधिक

हा रोमांच इथेच थांबत नाही. एक्सकॅव्हेशन झोन मुलांना डायनासोरची अंडी आणि जुने स्केलेटन्स शोधायला आकर्षित करतात. ज्यामुळे अ‍ॅडव्हेंचरमध्ये शोधमोहिमेची वेगळीच मजा जोडली जाते. संपूर्ण कुटुंबासाठी इंटरअॅक्टिव्ह डिस्प्ले, इंटरेस्टिंग वर्कशॉप्स आणि अ‍ॅक्टिव्हिटी झोनसुद्धा आहेत – जे मौजमस्ती आणि शिकणं यांचा सुंदर मेळ घालतात. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये हे ठिकाण फॅमिली आउटिंग्स, फ्रेंड्ससोबतचा वेळ आणि शालेय सहलींसाठी एकदम परफेक्ट आहे.

हॉलिडे लँड – फिनिक्स मार्केटसिटीचं खास वार्षिक इव्हेंट

हॉलिडे लँड हे फिनिक्स मार्केटसिटी पुणेचं खास वार्षिक इव्हेंट आहे, जे प्रत्येक वर्षी नवीन आणि हटके अनुभव देणारं इव्हेंट सादर करतं. यंदाचं डायनासोर वर्ल्डसुद्धा हेच सातत्य पुढे नेत असून येथे येणाऱ्या लोकांसाठी मजा, मौजमस्ती, साहस आणि थराराने भरलेला अविस्मरणीय अनुभव देतं.

उन्हाळी सुट्ट्यांसाठी एक परिपूर्ण अनुभव

फिनिक्स मार्केटसिटी पुणेचे सेंटर डायरेक्टर, अंशुमन भारद्वाज यांनी सांगितले “आम्ही शॉपिंगच्या पलीकडे घेऊन जाणारे अनुभव लोकांसमोर सादर करतो.  डायनासोर वर्ल्ड देखील शॉपिंग, एंटरटेनमेंट आणि फूड यापलीकडे जाऊन इंटरअॅक्टिव्ह आणि इमर्सिव्ह अनुभव देतं.”

 या सिझनमध्ये खास शॉपिंगसुद्धा

या थरारक अनुभवासोबतच, फिनिक्स मार्केटसिटी पुणे सादर करत आहे स्प्रिंग-समर कलेक्शन – ज्यामध्ये टॉप इंटरनॅशनल आणि लक्झरी ब्रँड्सचा समावेश आहे. त्यामुळे शॉपर्सना त्यांच्या वॉर्डरोबमध्ये नवीन ट्रेंड्ससह अपडेट होण्याची संधी मिळतेय.

इव्हेंटची माहिती:

ठिकाण: लिबर्टी स्क्वेअर, फिनिक्स मार्केटसिटी पुणे

तारीख: 11 एप्रिल ते 04 मे 2025

वेळ: दुपारी 2 ते संध्याकाळी 8

तिकीट खरेदीसाठी: https://tinyurl.com/PMCDinosaurWorld

फिनिक्स मार्केटसिटी पुणेबद्दल:

फिनिक्स मार्केटसिटी पुणे हे एक प्रीमियम शॉपिंग डेस्टिनेशन आहे जे टॉप ब्रँड्स, दर्जेदार डायनिंग आणि मनोरंजन यांचा सुंदर मिश्रण देतं ज्यामुळे हे ठिकाण प्रत्येकासाठी बेस्ट चॉईस ठरतं.