MISS MAHARASHTRA : मिस महाराष्ट्र २०२५ : वेल्लारी निंबालकर यांचा विजयी मुकुट आणि चित्रपटसृष्टीत दमदार पदार्पण

MISS MAHARASHTRA : मिस महाराष्ट्र २०२५ : वेल्लारी निंबालकर यांचा विजयी मुकुट आणि चित्रपटसृष्टीत दमदार पदार्पण

पुणे : मिस महाराष्ट्र २०२५ चा मानाचा किताब पटकावत वेल्लारी निंबालकर यांनी आपल्या आत्मविश्वास, कलागुण आणि नृत्यकौशल्याच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नुकतीच पुण्यातील न्याती प्लाझा मॉलमध्ये ‘मिस्टर मिसेस मिस महाराष्ट्र २०२५’ ही स्पर्धा मोठ्या दिमाखात पार पडली. वेल्लारी यांनी प्रभावी सादरीकरण करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

या भव्य स्पर्धेचे आयोजन यूएसस्क्वायर मीडिया अँड पब्लिसिटीने केले होते, ज्याचे नेतृत्व संचालक उद्धव खरड यांनी केले. न्याती प्लाझा मॉलमधील अनेक नामांकित ब्रँड्सनी फॅशन आणि ज्वेलरी पार्टनर म्हणून सहभाग नोंदवला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून निधी प्रितम, जीविका मराठे आणि रूपाली सरोदे या नामवंत व्यक्तींनी काम पाहिले.

वेल्लारी निंबालकर या कुशल कथक नृत्यांगना असून भरतनाट्यम डान्सर आणि सायकॉलॉजी स्टुडंट आहेत. त्यांनी मॉडेलिंग क्षेत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आहे. स्टेजवरील आत्मविश्वास आणि नृत्यातील निपुणतेमुळेच त्यांना हा बहुमान प्राप्त झाला. त्यांच्या यशामुळे मराठी कला आणि फॅशन क्षेत्रात एक नवा चेहरा उजळून निघाला आहे.

स्पर्धेत रुतुजा जगदाळे, रूपाली, लतिका राठोड, समीरा कोंढाळकर, डॉ. अशोक गवित्री, निधी पंड्या, मॉडेल साहिल, हृतिक तनपुरे, अमित कुमार, ग्रूमर व अँकर संजना बसवराज, अमर कालूखे, नेहा चतुर्वेदी, फोटोग्राफर्स अमित पारखे व बजरंग मिसाल, तसेच मेकअप आर्टिस्ट पल्लवी मयाने आणि सुनंदा खंडेकर यांचा विशेष सहभाग होता. याशिवाय, किड्स मॉडेल रुही आणि ओम जगदाळे यांनीही आपली उपस्थिती लावली.

वेल्लारी निंबालकर यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेशही निश्चित झाला असून, ते अमर कालूखे यांच्यासोबत एका नवीन म्युझिक अल्बममध्ये झळकणार आहेत. लवकरच हा अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

यूएसस्क्वायर मीडिया अँड पब्लिसिटीचे संचालक उद्धव खरड म्हणाले, “वेल्लारीप्रमाणेच आम्ही इतर नवोदित कलाकारांनाही व्यासपीठ देत आहोत. लवकरच आमचा एक मराठी चित्रपटही सुरु होणार आहे.”

वेल्लारी निंबालकर यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांच्या यशाची ही केवळ सुरुवात आहे; भविष्यात त्या मराठी चित्रपटसृष्टीत आपले भक्कम स्थान निर्माण करतील, अशी अपेक्षा आहे.