MEERA BORWANKAR BIG NEWS : पोलिस दलात पैशांचा भ्रष्टाचार : मीरा बोरवणकर यांचा आरोप
मुंबई : “पोलिस दलात पैसे खाल्ले जात नाहीत असं म्हणावं, असा एकही अधिकारी किंवा कर्मचारी नाही. असं एकही पोलिस स्टेशन नाही जिथे पैसे जमा होत नाहीत. पोलिस प्रशासनात वाईट प्रवृत्ती वाढल्याने पोलीसिंग पूर्णपणे संपले आहे,” असे स्पष्ट वक्तव्य निवृत्त पोलिस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी केले आहे.
राजकारणात खळबळ : शरद पवार-अजित पवार यांच्यात एकत्रित बैठक
लोकफीडर न्यूजने प्रसिद्ध केलेल्या व्हिज्युअलमधून त्यांनी पोलिस दलातील वाढत्या भ्रष्टाचारावर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, आता परिस्थिती इतकी वाईट झाली आहे की, योग्य आणि निष्ठावान सेवा देणाऱ्या पोलिसांची संख्या कमी होत चालली आहे.
काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप, काँग्रेसचे निष्ठावंत बडे नेते भाजपाच्या वाटेवर, पक्ष सोडण्याचे कारण…
त्यांच्या या विधानामुळे राज्यातील पोलिस प्रशासन आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अनेक वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय नेते यावर प्रतिक्रिया देण्याची शक्यता आहे.
मीरा बोरवणकर या महाराष्ट्रातील पहिल्या महिला आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक असून, त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्वाची खटले हाताळली आहेत. त्यांच्या सडेतोड भाष्यामुळे त्या नेहमी चर्चेत राहिल्या आहेत.