KPM मीडिया तर्फे ‘महाराष्ट्र उद्योग गौरव’ पुरस्काराने उद्योजकांचा सन्मान; सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते उद्योजकांचा सन्मान
पुणे | एप्रिल २०२५ : पुण्यातील हिंजवडी येथे ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार २०२५’ वितरण समारंभ २० एप्रिल २०२५ रोजी पार पडला. यामध्ये राज्यभरातील विविध उद्योग व व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या उद्योजकांचा सन्मान करण्यात आला. KPM Media च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी मा. प्रणव रवींद्र केंडे, मा. महेश मोहन व्यवहारे, मा. कार्तिक बोरकर या तरुण युवकांवर होती.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून महाबळेश्वरचे माजी नगरसेवक संतोष (आबा) शिंदे यांची उपस्थिती लाभली.
या पुरस्कार सोहळ्यात पुणे आणि परिसरातील ७० पेक्षा अधिक उद्योजकांना त्यांच्या व्यवसायातील उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात बांधकाम, पत्रकार, इलेक्ट्रिकल्स, सौंदर्य क्षेत्र, शिक्षण, पर्यटन, अन्न प्रक्रिया, माहिती तंत्रज्ञान आणि कृषी प्रक्रिया उद्योगांतील नामवंत उद्योजकांचा सहभाग होता.
हा पुरस्कार सोहळा सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाल्या की, तीन तरूण युवकांनी इतक्या मोठ्या स्तरावर हा कार्यक्रम घेतला याचंच खरंतर कौतुक करायला हवं. आम्ही कलाकार प्रेक्षकांसाठी आणि बॉक्सऑफिससाठी काम करतच असतो पण हे काम करत असताना या कामाचे कौतुक जर पुरस्कार रूपात होत असेल तर नक्कीच आनंद होत असतो. सर्व उद्योजकांचे कौतुक करत त्यांना मी शुभेच्छा देते.
महाबळेश्वरचे माजी नगरसेवक संतोष (आबा) शिंदे म्हणाले की, तीन युवकांनी मिळून सुरू केलेला हा कार्यक्रम कौतुकास्पद आहे. हा कार्यक्रम यशस्वी झाला परंतु इथून पुढे जेही काम ते हाती घेतली ते नक्कीच चांगल्या प्रकारे पूर्ण करतील अशी मला आशा आहे. KPM मिडीया समुह इतका उंचीवर जावा की मिडीया म्हटलं की KPM असचं डोळ्यासमोर यायला हवं.
पुरस्कार सोहळ्यात वक्त्यांनी सांगितले की, “आजचा उद्योगपती हा केवळ व्यवसाय चालवणारा नसून समाजाचा आधारस्तंभ देखील आहे. देशाच्या प्रगतीसाठी त्याचे योगदान फार मोठे आहे.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजकांकडून अतिशय सुबोध आणि प्रभावी पद्धतीने करण्यात आले.
यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. उद्योजकांनी एकमेकांशी नेटवर्किंग करत नवीन संधींबाबत चर्चा केली. कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचा आणि संवादाचा कार्यक्रम पार पडला.
या पुरस्कार सोहळ्यात मीडिया पार्टनर म्हणून एएनआय, बिझनेस स्टॅंडर्ड, लोकमत टाइम्स, दै. आरंभ पर्व, प्रिंट, रेड कार्पेट यांची जबाबदारी पार पाडली.
KPM Media ने घेतलेला हा पुढाकार स्तुत्य असून, अशा पुरस्कारांमुळे नवउद्योजकांना प्रेरणा मिळेल आणि उद्योजकीय वातावरणास चालना मिळेल, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
तीन तरूण मित्रांचा धडाकेबाज प्रवास सुरू
तीन युवकांनी मिळून अत्यंत प्रेरणादायी पद्धतीने ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार 2025’ चा भव्य सोहळा पुण्यात आयोजित केला होता. सामाजिक भान, व्यवसायातील नवनवीन प्रयोग आणि उद्योजकतेला मिळालेल्या चालना या सर्व बाबी या सोहळ्यातून अधोरेखित झाल्या. कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन, नावीन्यपूर्ण संकल्पना आणि विविध क्षेत्रातील उद्योजकांचा सन्मान हे या युवकांच्या नेतृत्वाचे ठळक उदाहरण ठरले. त्यांच्या अथक परिश्रमामुळे पुण्यातील हा पुरस्कार सोहळा एक संस्मरणीय पर्व ठरला आहे. अशा तरुण नेतृत्वाची समाजाला नितांत गरज आहे.