India Vs Pakistan army : कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता अन् पाकिस्तानी लष्करात धडाधड राजीनामे, नेमकं काय घडलं?

By: Editor_Pratik

On: Monday, April 28, 2025 9:43 AM

India Vs Pakistan army
Google News
Follow Us

India Vs Pakistan army : कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता अन् पाकिस्तानी लष्करात धडाधड राजीनामे, नेमकं काय घडलं?

India Vs Pakistan War: गेल्या आठवड्यात काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या दहशतवादी हल्ल्याचे कनेक्शन नेहमीप्रमाणे पाकिस्तानशी जोडले असल्याची बाब समोर आली होती. यानंतर भारतीय लष्कराच्या (Indian Army) तिन्ही दलांना अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

तर पाकिस्तानकडूनही (Pakistan Army) सीमारेषेवर सैन्याची जमवाजमव सुरु झाली होती. परिणामी भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटेल, अशी जोरदार चर्चा आहे. युद्धाचे हे ढग दाटले असताना पाकिस्तानी लष्करात भूकंप माजवणारी एक बातमी समोर आली आहे.

त्यानुसार सध्या पाकिस्तानी सैन्यदलात अधिकारी आणि सैनिक मोठ्याप्रमाणावर राजीनामे देत आहेत. या सगळ्यांना पाकिस्तानी लष्करातील नोकरी तातडीने सोडायची असल्याची बाब समोर आली आहे. एकूण 250 अधिकारी 1200 सैनिकांनी तडकाफडकी राजीनामे दिल्याची माहिती आहे.

India Vs Pakistan army

पाकिस्तानच्या 11व्या कोअरचे प्रमुख ओमर अहमद बोकारी यांनी लष्करप्रमुख असीम मुनीर यांना पत्र लिहले आहे. हे गोपनीय पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, 12 क्वेटा कोअर, फर्स्ट कॉर्प मांगला रिजन, नॉर्दन कमांडमधील अनेक अधिकारी आणि सैनिकांनी राजीनामे दिले आहेत. फर्स्ट कॉर्प मांगला रिजनमध्ये तर 50 अधिकारी आणि 500 सैनिकांनी लष्करी सेवेतून निवृत्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

या सगळ्यांनी वैयक्तिक कारण, कामाचा वाढलेला तणाव आणि भारतासोबत निर्माण झालेल्या तणावजन्य परिस्थितीबाबत सरकारकडे नसलेले ठोस धोरण या बाबींचा उल्लेख आपल्या राजीनामा पत्रात केला आहे. यानंतर पाकिस्तानी लष्कराच्या जनसंपर्क विभागाने युद्धाच्या परिस्थितीत कोणत्याही अधिकाऱ्याने अथवा सैनिकाने राजीनामा देऊ नये, अशी तंबी देऊन ही पडझड तुर्तास थांबवल्याचे सांगितले जात आहे.

Pune Bjp : भाजप शहराध्यक्षपदासाठी बिडकर, भिमाले, शिळमकर यांची नावे आघाडीवर; निवड प्रक्रिया पूर्ण

या परिस्थितीवर तोडगा काढावा, अशी मागणी लष्करप्रमुखांकडे करण्यात आली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानी सरकार काय पावले उचलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1948, 1965, 1971 आणि 1999 अशी चार युद्ध झाली. या चारही युद्धांमध्ये भारताने पाकिस्तानला पार झोपवले होते. त्यामुळे आता पुन्हा युद्ध झाल्यास भारतीय लष्कराच्या संभाव्य संहाराची भीती अनेकांना वाटत असावी. त्यामुळे पाकिस्तानमधील बडे नेते आणि लष्करी अधिकाऱ्यांची कुटुंब देशातून पळ काढत आहेत.

अलीकडेच पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि राजकीय नेते बिलावल भुट्टो यांच्या कुटुंबाने पाकिस्तान सोडून परदेशात पळ काढला होता.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now