Crime News : दारु पाजण्यास दिला नकार, कुऱ्हाडीने सपासप वार करुन मित्रानेच घेतला मित्राचा जीव, धक्कादायक घटना…

By: Editor_Pratik

On: Sunday, April 27, 2025 5:50 AM

crime-16x-114846480
Google News
Follow Us

Crime News : दारु पाजण्यास दिला नकार, कुऱ्हाडीने सपासप वार करुन मित्रानेच घेतला मित्राचा जीव, धक्कादायक घटना…

Jalna liquor dispute murder : दारु पिण्यावरून झालेल्या वादातून मित्राने मित्रावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री जालन्यातील जामवाडी शिवारात हा प्रकार घडला. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरु असल्याची माहिती आहे.

साम टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, नरेश उर्फ बंटी रंजवे असे मृत्यू झालेल्या तरूणाचं नाव आहे. शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह जामवाडीतील शेतशिवारात आढळून आला. त्यानंतर गावात चांगलीच खळबळ उडली. स्थानिकांनी लगेच याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. तसेच याप्रकरणी गु्न्हा दाखल करत तपास सुरु केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री दारू पिण्याच्या किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेला आणि हाणामारी सुरु झाली. त्यानंतर आरोपी मित्राने बंटीवर कुऱ्हाडीने सपासप वार केले. या हल्ल्यात बंटीचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने जामवाडी शिवारात त्याचा मृतदेह टाकून घटनास्थळावरून पसार झाला.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मित्राला अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे. तसेच त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now