काळ्या काचा आणि ‘व्हीआयपी नंबर प्लेट्स’ना अटकाव; जिल्ह्यात मोठी कारवाई; वाहतूक शिस्तीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन सज्ज; नियमबाह्य गाड्या थेट जप्त करण्याचे आदेश

By: Editor_Pratik

On: Monday, April 21, 2025 11:48 AM

black-number-plate
Google News
Follow Us

काळ्या काचा आणि ‘व्हीआयपी नंबर प्लेट्स’ना अटकाव; जिल्ह्यात मोठी कारवाई; वाहतूक शिस्तीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन सज्ज; नियमबाह्य गाड्या थेट जप्त करण्याचे आदेश

जिल्ह्यातील वाहतुकीतील बेशिस्त रोखण्यासाठी आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांना चाप बसवण्यासाठी पोलीस प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. विशेषतः काळ्या काचा असलेल्या गाड्या, फॅन्सी नंबर प्लेट्स, तसेच आमदार-खासदार किंवा त्यांच्या ओळखीने फिरणाऱ्या गाड्यांवर कडक कारवाई होणार आहे.

या संदर्भात सर्व संबंधित वाहनांवर तात्काळ कारवाई करून गाड्या जप्त करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

“वाहतूक शिस्तीचे पालन व्हावे, कायद्याचे उल्लंघन थांबावे आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळावा, या उद्देशाने ही मोहीम राबवली जात आहे,” असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

पोलीस विभागाच्या माहितीनुसार, शहरात अनेक गाड्यांमध्ये नियमबाह्य काळ्या काचा बसवण्यात आल्या आहेत. अशा गाड्यांमुळे अपघाताची शक्यता वाढते आणि सुरक्षेच्या दृष्टीनेही धोका निर्माण होतो. त्यामुळे अशा गाड्यांवर आता कोणतीही रियायत दिली जाणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now