BIG NEWS : म्हाडाची घरे स्वस्त; किमती ठरवण्यासाठी त्रिसदस्यीय समिती
गेल्या काही वर्षांत म्हाडाच्या घरांचे दर गगनाला भिडल्याने सामान्य नागरिकांसाठी स्वप्नवत वाटणारी ‘स्वस्त घर’ ही संकल्पना धुसर झाली आहे. या पार्श्वभूमीवर म्हाडाने घरांच्या किमतीचे नवे सूत्र तयार करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. ही समिती पुढील तीन महिन्यांत आपला अहवाल उपाध्यक्षांकडे सादर करणार असून, त्यानंतर तो शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.
किंमतींची नव्याने आखणी : सध्या म्हाडाची घरांची किंमत ठरवताना जमिनीचा खर्च, बांधकाम खर्च, आस्थापन खर्च यांचा विचार केला जातो. अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडा शून्य टक्के नफा घेते, तर मध्यम व उच्च उत्पन्न गटांसाठी अनुक्रमे 10 आणि 15 टक्के नफा आकारला जातो.
मात्र अनेकदा म्हाडा भूखंड विकत घेतल्यानंतर वर्षानुवर्षे तिथे कोणतीही बांधकामे करत नाही. त्या काळात झालेला सुरक्षा व देखभाल खर्च घरांच्या किमतीत समाविष्ट केला जातो, त्यामुळे किंमती वाढतात. हीच बाब लक्षात घेऊन, आता अशा प्रकारचा खर्च सर्वसामान्यांनी का सहन करावा? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
क्षेत्रफळ नव्हे, किंमत महत्त्वाची? : सध्या उत्पन्न गट ठरवताना घराचे क्षेत्रफळ निकष मानला जातो. मात्र उपनगरात 300 चौ.फुटाचे घर परवडणारे असते, तर तेवढ्याच आकाराचे घर दक्षिण मुंबईत प्रचंड महागडे असते. त्यामुळे उत्पन्न गट ठरवताना क्षेत्रफळाऐवजी घराची किंमत निकष म्हणून वापरता येईल का, याचाही विचार समिती करणार आहे.
सर्वसामान्यांसाठी दिलासा? : नवे सूत्र तयार करताना म्हाडाचे आर्थिक नुकसान होणार नाही आणि सामान्यांना स्वस्त घरही मिळेल, याची काळजी घेतली जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात म्हाडाची घरे खरंच परवडतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप, काँग्रेसचे निष्ठावंत बडे नेते भाजपाच्या वाटेवर, पक्ष सोडण्याचे कारण…
BIG NEWS : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल; ‘राज ठाकरेंचं वर्तन तालिबानी पद्धतीचं’
लाडकी बहीण योजना : एप्रिलचा हप्ता १५०० रुपये मिळणार की फक्त ५००? जाणून घ्या सविस्तर माहिती!
अश्लील फोटो, शारीरिक संबंध… संजय बांगर यांच्या मुलीचा भारतीय क्रिकेटपटूवर खळबळजनक आरोप!