अझिम प्रेमजी विद्यापीठात ‘डेव्हलपमेंट लीडरशिप २०२६’ पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

बंगळुरू येथील अझिम प्रेमजी विद्यापीठात ‘डेव्हलपमेंट लीडरशीप प्रोग्राम’ पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रिया अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२५ असेल.

‘डेव्हलपमेंट लीडरशीप प्रोग्राम’ हा ११ महिन्यांचा अर्धवेळ डिप्लोमा अभ्यासक्रम आहे. सहभागी विद्यार्थ्यांना विद्यमान काम आणि नोकरी/व्यवसाय सुरू ठेवून अभ्यास करता यावा या दृष्टीनेे अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. तीन टप्प्यातील (टर्म) हा अभ्यासक्रम विद्यापीठात प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन पद्धतीनेही शिकता येणार आहे.

विकास क्षेत्रात आठ किंवा त्याहून अधिक वर्षांचा अनुभव असलेल्या मध्यम ते वरिष्ठ पातळीच्या व्यावसायिकांच्या दृष्टिकोनातून या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. या व्यक्ती आधीच त्यांच्या संस्थांमध्ये नेतृत्वाच्या भूमिकेत आहेत किंवा लवकरच अशा भूमिका स्वीकारण्याची शक्यता आहे, अशांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे. स्वयंसेवी संस्था, सामाजिक चळवळी आणि तळागाळातील संघटनांमध्ये काम करणारे या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात.

‘डेव्हलपमेंट लीडरशीप प्रोग्राम’ हा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. कारण…

१. भारतातील विकासाच्या वास्तवाला आकार देणाऱ्या ऐतिहासिक प्रक्रिया आणि प्रत्यक्ष अनुभवांबद्दलचे त्यांचे दृष्टिकोन अधिक खोलवर मांडता येईल, ज्याद्वारे, त्यांच्या कार्याची अधिक चांगली माहिती मिळणे शक्य होईल.

२. समता, न्याय आणि शाश्वतता वाढवणारे पर्यायी विकास दृष्टिकोन आणि परिणामांची कल्पना करा.

३. समावेशक, अनुकूल आणि सहयोगी संस्था तयार करण्यासाठी नेतृत्व क्षमता मजबूत करा.

४. आर्थिक व्यवस्थापन, संवाद आणि डेटा विश्लेषणासाठी क्षमता वाढवा.

विकास शाळांच्या संचालिका अरिमा मिश्रा म्हणाल्या, “हा अभ्यासक्रम या क्षेत्रातील मध्यम प्रकारचे व्यवसाय आणि वरिष्ठ व्यावसायिकांना विकासाच्या व्यापक दृष्टिकोनातून त्यांचे संघटनात्मक अनुभव प्रतिबिंबित करण्यास आणि स्थानबद्ध करण्यास अनुमती देतो. तसेच त्यांना त्यांच्यातील कार्य आणि नेतृत्व करण्याच्या क्षमतेबद्दल चांगल्या प्रकारे माहिती देण्यासाठी त्यांचे क्षीतिज विस्तृत करण्यास मदत करते.”

महत्त्वाच्या तारखा

२०२६ प्रवेश प्रक्रिया अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ मे २०२५

लेखा प्रकल्प आणि मुलाखती : जून – जुलै २०२५

वर्ग सुरू : जानेवारी २०२६ चा पहिला आठवडा

(*तारखा अनिश्चित आहेत)

अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना आणि अभ्यासक्रमाची माहिती, पात्रता आणि शुल्क याबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया आमच्या https://azimpremjiuniversity.edu.in/programmes/development-leadership या संकेतस्थळाला भेट द्या.

आमच्याशी संपर्क साधा:

प्रवेशासाठी मोबाईल क्रमांक : ८९५१९७८०९१

ईमेल : admission.diploma@apu.edu.in