टांझानियामधून आलेल्या ७० वर्षीय रुग्णाला सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये मांडीचे हाडाचे प्रत्यारोपण करून चालण्याची नवी संधी

By: Editor_Pratik

On: Tuesday, April 29, 2025 12:09 PM

Sahyadri Hospital सह्याद्रि हॉस्पिटल
Google News
Follow Us

सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, डेक्कन जिमखाना येथे एक अत्यंत गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक अशी पूर्ण मांडीच्या हाडाची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया — म्हणजेच टोटल फेम्यूर रिप्लेसमेंट — यशस्वीपणे करण्यात आली. ही शस्त्रक्रिया ७० वर्षीय टांझानियामधील पुरुष रुग्णावर करण्यात आली.

रुग्ण जेव्हा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले, तेव्हा त्यांच्या डाव्या मांडीला तीव्र वेदना होत होत्या आणि ते चालूच शकत नव्हते. पण शस्त्रक्रियेनंतर आता ते पुन्हा चालू लागले असून त्यांच्या हालचालींमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांच्या मेहनतीमुळे आणि योग्य वैद्यकीय नियोजनामुळे ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.

ही केस वैद्यकीयदृष्ट्या अतिशय गुंतागुंतीची होती कारण या रुग्णाला इस्केमिक हृदयरोग (ischemic heart disease) (अशी स्थिती ज्यामध्ये हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा होऊ शकत नाही) झाला होता. त्याखेरीज यापूर्वी त्यांची कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट (सीएबीजी) सर्जरी देखील झालेली होती. आणि काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर कस्टम नी रिप्लेसमेंट सर्जरी देखील करण्यात आली होती. हि गुडघ्याची शस्त्रक्रिया करताना त्यामध्ये एका मेगा प्रोस्थेसिसचा वापर केला होता. मेगा प्रोस्थेसिस म्हणजे विशेष प्रकारे डिझाईन करण्यात आलेले एक इम्प्लान्ट.

हे इम्प्लान्ट त्यांच्या फेम्यूरच्या (मांडीचे हाड) जागी लावण्यात आले होते. काही काळाने या इम्प्लान्टने आजूबाजूच्या हाडाला गंभीर नुकसान पोहोचवण्यास सुरुवात केली. परंतु या रुग्णाला जेव्हा फेमोरल नेक (मांडीच्या हाडाच्या वर) फ्रॅक्चर झाले परंतु कित्येक महिने त्यावर काहीही उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे हि स्थिती अधिकच गंभीर झाली.

या केस विषयी अधिक माहिती देताना डेक्कन जिमखाना येथे असलेल्या सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे कन्सल्टन्ट, ऑर्थोपेडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन, डॉ अभिजित आगाशे म्हणाले, ३१ जानेवारी २०२५ रोजी हे रुग्ण आमच्याकडे पहिल्या कन्सल्टेशनसाठी आले तोपर्यंत त्यांचे जुने इम्प्लान्ट सैल होऊन त्यामुळे आजूबाजूच्या मांडीच्या हाडाचे 60% हून अधिक नुकसान झालेले होते. आणि आधीचे इम्प्लान्ट योग्य पद्धतीने काम देखील करत नव्हते. तरीदेखील आधीचे नी इम्प्लान्ट तसेच ठेवून हिप रिप्लेसमेंट करता येते का ही शक्यता पडताळण्यासाठी आम्ही सीटी स्कॅन केले.

परंतु  स्कॅनमध्ये निरोगी बोन स्ट्रक्चर फारसे उरलेले दिसत नव्हते. त्यामुळे संपूर्ण फेम्यूर (मांडीचे हाड) रिप्लेस करण्यावाचून आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नव्हता. आम्ही त्यांना ११ फेब्रुवारी २०२५ रोजी रुग्णालयात भरती करून घेतले. त्यामुळे या गुंतागुंतीच्या सर्जरीसाठी पुरेसे नियोजन आणि तयारी करण्यासाठी आम्हाला वेळ मिळाला.”

 डॉ. आगाशे म्हणाले, टोटल फेम्यूर रिप्लेसमेंट ही एक अतिशय दुर्मिळ आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांमध्ये, आणि ज्यांना हृदयविकारासारखे आजार आहेत, अशा रुग्णांमध्ये ही सर्जरी फारच कमी वेळा केली जाते. या प्रक्रियेत रुग्णाच्या मांडीचे पूर्ण हाड — खुब्यापासून गुडघ्यापर्यंत — काढून त्याऐवजी एक मेटल इम्प्लान्ट बसवला जातो.

या इम्प्लान्टमध्ये एक कृत्रिम खुब्याचा सांधा (hip joint) आणि हालचाल करता येणारा गुडघ्याचा सांधा (knee joint) बसवलेला असतो रुग्णाला संपूर्ण भूल देऊन ही शस्त्रक्रिया केली जाते आणि संपूर्ण प्रक्रिया साधारण सात तास चालते. मांडीवर चिरा देऊन खराब झालेले हाड काढले जाते, त्याच्या जागी नवीन कृत्रिम सांधा बसवला जातो, आणि हालचाल सुरळीत व्हावी यासाठी आवश्यक असलेले स्नायू आणि टेंडन्स पुन्हा जोडले जातात.”

 या रुग्णाच्या हृदयाचे कार्य खूपच मंदावलेले होते, त्यांचे इजेक्शन फ्रॅक्शन (हृदय रक्त किती चांगल्या प्रकारे पम्प करते त्याचे मापन) फक्त २५ ते ३०% म्हणजे सामान्यापेक्षा खूपच कमी होते, आणि हे आमच्यासाठी सर्वात मोठे आव्हान होते.  डॉ आगाशे म्हणाले,इतकी अति जास्त जोखीम असलेल्या कार्डियाक रुग्णाला भूल देऊन इतकी मोठी सर्जरी करणे खूप जोखीमचे असते. पण अचूक नियोजन, प्रगत इमेजिंग तंत्रज्ञान आणि आधुनिक भूल पद्धती यामुळे आम्ही ही प्रक्रिया सुरक्षितपणे करू शकलो.”

 सर्जरीनंतर सुरुवातीचे २-३ दिवस रुग्णाला आयसीयूमध्ये ठेवून काटेकोरपणे निगराणी केली गेली आणि त्यांचे हृदय स्थिर राहील याची पूर्णत: काळजी घेण्यात आली. त्यांची तब्येत सुधारू लागल्यानंतर मग हळूहळू रिहॅबिलिटेशन प्रक्रियेला सुरुवात झाली. डॉ आगाशे यांनी सांगितले,सुरुवातीला बसणे, मग उभे राहणे, आधार घेऊन पावले टाकणे अशा क्रियांमध्ये आम्ही त्यांना मदत करू लागलो. आज ते हातात काठी धरून चालू शकतात, मात्र काही आठवड्यांपूर्वी हे त्यांच्यासाठी केवळ अशक्य होते.”

 २५ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांना डिस्चार्ज दिला. त्यानंतर त्यांच्या तब्येतीमध्ये उत्तम सुधारणा होत आहे. त्यांच्या प्रगतीवर आमच्या मेडिकल टीमचे बारीक लक्ष आहे. अशा गंभीर हृदय समस्या आणि हाडांचे नुकसान असलेल्या, वयस्कर रुग्णावर पुण्यामध्ये करण्यात आलेली हि पहिलीच टोटल फेम्यूर रिप्लेसमेंट सर्जरी आहे. टीमच्या सहयोगाने, रुग्ण-केंद्रित दृष्टिकोन वापरून, आधुनिक तंत्रज्ञान व तज्ञ देखभाल यांचा वापर करून, अतिशय जोखमीच्या सर्जरी यशस्वीपणे करण्याची सह्याद्रि हॉस्पिटल्सची क्षमता या केसमध्ये मिळवण्यात आलेल्या यशाने अधोरेखित केली आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now