विश्वासार्ह आणि उत्तरदायी सराफ पेढी असलेल्या मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने पुण्यातील विठ्ठलवाडी येथील सिंहगड रोडवरील त्यांच्या नवीनतम शोरूमच्या उद्घाटनाची आज अभिमानाने घोषणा केली. ६,८२३ चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेल्या नवीन दालनाची रचना ही ग्राहकांना विविध डिझाइन आणि शैलीतील दागिन्यांच्या उत्कृष्ट संग्रहासह जागतिक दर्जाचा खरेदी अनुभव देण्यासाठी केली गेली आहे. हे नवीन दालन म्हणजे अपवादात्मक कारागिरी आणि अतुलनीय सेवा प्रदानतेसह पश्चिम भारतात आपला ठसा वाढवण्याच्या मलाबार ब्रॅण्डच्या वचनबद्धतेतील आणखी एक पुढचे पाऊल आहे.
हे शोरूम ब्रँडचे भारतातील पश्चिम प्रदेशातील ४४ वे आउटलेट आहे, जे या प्रदेशात त्याची उपस्थिती आणि नेतृत्व आणखी मजबूत करते. नवीन शोरूमचा उद्घाटन समारंभ महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य श्री भीमराव (अण्णा) धोंडिबा तापकीर, व्यवस्थापन पथकाचे सदस्य, मौल्यवान ग्राहक आणि हितचिंतक यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
भारत, आखाती देश, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासह १३ देशांमध्ये ३९० हून अधिक शोरूम्ससह, मलाबार गोल्ड अँड डायमंड्स त्याच्या विस्तृत संग्रह, अपवादात्मक गुणवत्ता आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनासाठी प्रसिद्ध आहे.
आपली उपस्थिती आणखी मजबूत करत, ब्रँड विद्यमान मार्च महिन्यामध्ये संपूर्ण भारतात १२ नवीन शोरूम उघडण्यास सज्ज आहे, ज्यामुळे प्रीमियम दागिने अधिक सुलभ बनवण्याची त्याची वचनबद्धता आणखी दृढ होईल. २६ देशांमधील २२,००० बहुभाषिक कर्मचाऱ्यांच्या समर्पित टीमच्या पाठिंब्याने, ब्रँडने जगभरातील १.५ कोटींहून अधिक समाधानी