मलाबार गोल्ड अँड डायमंड्स मार्चमध्ये १२ नवीन शोरूम उघडणार

By: Editor_Pratik

On: Saturday, March 22, 2025 8:44 AM

मलाबार गोल्ड Malabar Gold
Google News
Follow Us

१३ देशांमध्ये ३९१ शोरूमपर्यंत जागतिक विक्री जाळ्याचा विस्तार

जगातील सहाव्या क्रमांकाचे सर्वात मोठे दागिने विक्रेते असलेल्या, मलाबार गोल्ड अँड डायमंड्स भारतात आपली उपस्थिती आणखी मजबूत करत असून, मार्च २०२५ अखेरपर्यंत १२ नवीन शोरूम सुरू करणार आहे. या नवीनतम विस्तार मोहिमेमुळे १३ देशांमध्ये त्याच्या एकूण शोरूमची संख्या ३९१ पर्यंत जाईल आणि भारतातील १९ राज्यांमध्ये त्याची उपस्थिती असेल.

नियोजित नवीन शोरूम मुंबईतील पनवेल, पुण्यातील सिंहगड रोड, ओडिशातील ब्रह्मपूर आणि सौभाग्य नगर; झारखंडमधील धनबाद, कर्नाटकातील होस्पेट, नगरभावी आणि चित्रदुर्ग; आंध्र प्रदेशातील नंद्याल, अमलापुरम, मछलीपटनम, उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे सुरू आहेत.

मलाबार समूहाने या विस्तार टप्प्यात ६०० कोटी रुपये गुंतवले आहेत आणि या आर्थिक वर्षात ४०६ कर्मचाऱ्यांची नव्याने भरती करून, त्यांची विविध भूमिकांवर नियुक्ती केली आहे.

मलाबार गोल्ड अँड डायमंड्स विद्यमान २०२५ सालात एकंदर ६० नवीन शोरूम उघडण्याची योजना आखत आहे, ज्यामुळे त्यांची जागतिक उपस्थिती आणखी विस्तारेल. एप्रिल २०२५ मध्ये, समूह आणखी ५ नवीन शोरूम उघडण्यास सज्ज झाले आहे, ज्यायोगे दक्षिण आशिया, ब्रिटन आणि कॅनडामध्ये त्यांचा विस्तार होईल.

मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने प्रसिद्ध अभिनेता आणि ब्रँड अम्बॅसेडर एनटीआर ज्युनियर यांच्यासोबत ग्राहक जागरूकता मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम या ब्रँडला एक जबाबदार सराफ पेढी म्हणून अधोरेखित करताना, शाश्वत पद्धतीबद्दल ध्यास, प्रमाणित हॉलमार्क केलेले दागिने आणि प्रमाणित नैसर्गिक हिऱ्यांबद्दलची त्यांची वचनबद्धता अधोरेखित करत आहे.

नियोजित विस्ताराविषयी बोलताना, मलाबार समूहाचे अध्यक्ष एम.पी. अहमद म्हणाले, “आमची विस्तार योजना जागतिक स्तरावर आपला प्रभाव वाढवण्याच्या आणि जगभरातील अधिकाधिक लोकांना जागतिक दर्जाचा खरेदी अनुभव देण्याच्या आमच्या व्यापक दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. आम्ही नैतिक व्यवसाय पद्धती आणि जबाबदार स्रोतांतून सोने मिळविण्याबाबत वचनबद्ध आहोत, जे आमच्या मूल्यांच्या केंद्रस्थानी आहेत.

आम्ही वाढ साधत राहतो आणि नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करतो, प्रत्येक उघडले जात असलेले नवीन शोरूम हे जगातील नंबर एकचे आभूषणांचे आणि लक्झरी ब्रँड बनण्याच्या आमच्या स्वप्नाला साकार करण्याच्या दिशेने एक पुढचे पाऊल ठरत आहे. जागतिक बाजारपेठेतील हा प्रवेश केवळ आमची पोहोच वाढवत नाही तर जगभरातील आमच्या ग्राहकांना उत्कृष्टता, अखंडता आणि अतुलनीय अभिजातता प्रदान करणारा एक विश्वासार्ह ब्रँड म्हणून आमचे स्थान आम्ही मजबूत करतो.”

आमचे आगामी सर्व शोरूम पारंपारिक आणि समकालीन दागिन्यांच्या संग्रहांची विविध श्रेणी प्रस्तुत करतील, वैयक्तिकीकृत खरेदी अनुभवासह, ग्राहक सेवा उत्कृष्टतेसाठी मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे समर्पण ही दालने दर्शवतील.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026