फायरफ्लाय फायर पंप्स, वॉलफिरेस्ट आणि झारखंड राज्य वन प्रशिक्षण संस्था यांनी भारतातील पहिल्या अत्याधुनिक वनाग्नि व्यवस्थापन प्रशिक्षणासाठी भागीदारी केली

आशियातील अग्रगण्य अग्निशमन पंप निर्माता आणि निर्यातदार फायरफ्लाय फायर पंप्स यांनी स्पेनमधील प्रसिद्ध जंगला मधील वणवा विझवण्याच्या उपकरणांच्या  उत्पादक कंपनी वॉलफिरेस्ट आणि झारखंड राज्य वन प्रशिक्षण संस्था महिलोंग यांच्यासह ऐतिहासिक सहकार्याची घोषणा केली आहे. एकत्रितपणे, त्यांनी भारताच्या इतिहासातील पहिल्यांदाच अत्याधुनिक साधने आणि तंत्रांचा वापर करून वनाग्नि व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रशिक्षण उपक्रमाचा उद्देश वन अधिकाऱ्यांना प्रभावी अग्निशमन तंत्र, प्रतिबंधक उपाय आणि आग नियंत्रित करण्याच्या कौशल्याने सक्षम करणे हा आहे. त्यामुळे भारताचा अनमोल नैसर्गिक वारसा आणि जैवविविधता संरक्षित राहील.

फायरफ्लाय फायर पंप्स हे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि वनाग्नि नियंत्रणाच्या आघाडीवर असलेल्या अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे,” असे [रोहित माळी, संचालक – फायरफ्लाय फायर पंप्स] यांनी सांगितले. “वॉलफिरेस्ट आणि झारखंड राज्य वन प्रशिक्षण संस्थेसोबत भागीदारी करून, भारतातील वन अधिकाऱ्यांना सर्वोत्तम साधने आणि यंत्रणा पुरवण्यात आम्हाला अभिमान वाटतो.”

प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये खालील गोष्टींचा समावेश झाला:

✔ प्रगत अग्निशमन तंत्र: अत्याधुनिक उपकरणे आणि कार्यक्षम अग्निशमन यंत्रणा वापरण्यासंबंधी प्रशिक्षण.
✔ वणवा / वनाग्नि वर्तन विश्लेषण: वनाग्निच्या हालचाली समजून घेऊन त्याचा प्रसार रोखण्याच्या पद्धती.
✔ जोखीम मूल्यांकन व प्रतिबंधात्मक उपाय: वनाग्नि रोखण्यासाठी आणि त्याचा परिणाम कमी करण्यासाठी प्रभावी धोरणे.
✔ वणवा / अग्निशमन साधनांचा सुरक्षित व प्रभावी वापर: वॉलफिरेस्टच्या विशेष उपकरणांसह प्रत्यक्ष प्रशिक्षण.

प्रशिक्षणाचा समारोप उत्साहात झाला, ज्यामध्ये ड्रोनस्टर—रोबोटद्वारे नियंत्रित मानवरहित भूवाहन—याचे अनावरण, प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आणि प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली. याशिवाय, सहभागी सदस्यांना पाणी हेलिट्रान्सपोर्ट करण्याची सिस्टम तसेच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि अग्रभागी कार्यरत अग्निशामकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक सुरक्षात्मक उपकरणे आणि पोशाख यांची प्रात्यक्षिके करून देण्यात आली.

“वॉलफिरेस्ट ही संपूर्ण जगभरात वनाग्नि व्यवस्थापनासाठी नाविन्यपूर्ण उपाय आणि प्रशिक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे,” असे [जुआन कार्लोस, मुख्य विक्री अधिकारी – वॉलफिरेस्ट] यांनी नमूद केले. “फायरफ्लाय फायर पंप्स आणि झारखंड राज्य वन प्रशिक्षण संस्थेसोबत काम करण्याची संधी आम्हाला लाभली आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो.”

या ऐतिहासिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन झारखंड राज्य वन प्रशिक्षण संस्था महिलोंग येथे करण्यात आले आहे. ही संस्था वन अधिकाऱ्यांसाठी ज्ञान सामायिकरण आणि क्षमता विकासासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ प्रदान करेल.

ही भागीदारी भारताच्या वनाग्नि नियंत्रणाच्या प्रयत्नांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. फायरफ्लाय फायर पंप्स,

वॉलफिरेस्ट आणि झारखंड राज्य वन प्रशिक्षण संस्था एकत्र येऊन भारतभर वनाग्नि व्यवस्थापन पद्धतींमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी वचनबद्ध आहेत.