भुकुम (पुणे) येथील हिंदु राष्ट्र जागृती सभेला धर्माभिमान्यांचा उस्फूर्त प्रतिसाद!

भारतात रामराज्य आणण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा ! – श्री. पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती

पुणे – भारताला हिंदु राष्ट्र करायचे आहे आणि हेच ध्येय घेऊन सर्वत्रचे हिंदू आज कार्यरत आहेत. नागपूर मध्ये घडलेल्या दंगली वरून आपल्याला हिंदु धर्मीयांवर होणाऱ्या आघातांची भीषणता लक्षात आली असेल. हिंदुहितासाठी भारतात रामराज्य, म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आपण सर्वांनी पुढाकार घेऊया, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी केले. भुकुम (पुणे) येथे 22 मार्च या दिवशी मुक्ताई लॉन्स सभागृहात झालेल्या हिंदु राष्ट्र जागृती सभेत ते बोलत होते. या सभेला 135 हून अधिक हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी, जिज्ञासू यांची उपस्थिती होती.

      शंखनाद आणि मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून सभेचा आरंभ झाला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यानंतर मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पुणे संयोजक हभप दत्तात्रय चोरघे महाराज यांनी मंदिर महासंघाच्या कार्याची ओळख सर्व जिज्ञासूंना करून दिली. तसेच स्वयंभू श्री रामेश्वर देवस्थान भुकूमचे मुख्य विश्वस्त श्री. विजय माझीरे यांनी सभेच्या आयोजनासाठी सर्वतोपरी सहाय्य केले. सभेसाठी सभागृह, विद्युत आणि ध्वनिक्षेपक यंत्रणेसह संपूर्ण सहाय्य केले.

     या सभेला भुकूम गावच्या सरपंच सौ. सुवर्णा पानसरे, माजी सरपंच गौरी भरतवंश, श्री दिनेश माझीरे, जीवनज्योत फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. दिलीप चोरघे, सदस्य श्री. नितीन माझीरे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष श्री. तुषार माझीरे, श्री. बाळासाहेब माझीरे, आर्ट ऑफ लिविंगचे श्री. विजय उनेचा, घोटावडे गावाचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. बाळासाहेब खाणेकर अन् त्यांच्या पत्नी आणि घोटावडे गावच्या सरपंच सौ. सारिका खाणेकर यांची सुद्धा उपस्थिती लाभली.