टाटा मोटर्सने बाऊमा कॉनएक्सपो इंडिया २०२६ मध्ये नेक्स्ट-जनरेशन ॲग्रिगेट्स पोर्टफोलिओ प्रदर्शित केला

By: Editor_Manas

On: Tuesday, September 15, 2026 3:03 PM

Google News
Follow Us

मुंबई, १५ सप्टेंबर २०२६ : टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक वाहन उत्पादक आणि मोबिलिटी सोल्यूशन्स प्रदाता कंपनीने बाऊमा कॉनएक्सपो  इंडिया २०२६ मध्ये नेक्स्ट-जनरेशन ॲग्रिगेट्सचा सर्वसमावेशक पोर्टफोलिओ प्रदर्शित केला. या प्रदर्शनात १० केव्हीए ते १२५ केव्हीए श्रेणीतील सीपीसीबी IV+ (केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ IV+) मानकांशी सुसंगत टाटा मोटर्स जेनसेट्स, ०.७ लिटर ते ३.३ लिटर क्षमतेची उच्च कार्यक्षम इंडस्ट्रियल इंजिन्स आणि उच्च स्थानिक घटकांचा (लोकलाइज्ड कंटेंट) समावेश असलेला भारताचा पहिला हब रिडक्शन ॲक्सल ‘एचआर २१० लाइव्ह ॲक्सल’ यांचा समावेश आहे. ही सोल्यूशन्स मटेरियल हँडलिंग, बांधकाम उपकरणे, औद्योगिक अनुप्रयोग (इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स) आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहेत, तसेच आव्हानात्मक बांधकाम परिस्थितीतही विश्वासार्हता, उच्च कार्यक्षमता आणि टिकाऊपणा देण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आली आहेत.

या प्रदर्शनाबाबत मत व्यक्त करत टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्सच्या पार्ट्स आणि ॲग्रिगेट्स बिझनेसचे प्रमुख श्री. विक्रम अग्रवाल म्हणाले, “बाऊमा कॉनएक्सपो हे टाटा मोटर्सच्या ॲग्रिगेट्स पोर्टफोलिओची व्याप्ती आणि क्षमता प्रदर्शित करण्यासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे. आम्ही भारतामध्ये जागतिक दर्जाच्या इंजिनिअरिंग क्षमता निर्माण केल्या आहेत: अत्यंत आव्हानात्मक कामकाजाच्या परिस्थितीतही प्रभावी कामगिरी करू शकतील अशी इंजिन्स, जेनसेट्स आणि ॲक्सल्स भारतात डिझाइन, विकसित आणि उत्पादित केले आहेत. उद्योगक्षेत्र अखंड आणि उच्च-तीव्रतेच्या प्रकल्प चक्रांकडे वळत आहे, तसतसे आमच्या ग्राहकांना सोल्यूशन्सची गरज आहे, ज्यांवर ते पूर्ण विश्वास ठेवू शकतील. अधिक सुरक्षित आणि अधिक कार्यक्षम उत्पादने वितरित करत आमच्या ॲग्रिगेट्स पोर्टफोलिओला अधिक दृढ करणे आणि विविध अनुप्रयोगांमध्ये आमचा विस्तार करणे यावर आमचा मुख्य भर आहे.”

बाऊमा कॉनएक्सपो २०२६ मध्ये टाटा मोटर्स ॲग्रिगेट्स

  •         जेनसेट इंजिन्स: ०.७ लिटर २-सिलेंडर इंजिन (१०-१५ केव्हीए), १.५ लिटर ४-सिलेंडर (२०-३५ केव्हीए), कॉम्पॅक्ट, इंधन-कार्यक्षम आणि अत्यंत विश्वासार्ह.
  •         इंडस्ट्रियल इंजिन्स: ४९७ नॅचरली ए (४१ किलोवॅट), ४९७ टीसी (७४ किलोवॅट) आणि ३.३ लिटर टीसी (१०१.५ किलोवॅट) – बांधकाम, मटेरियल हँडलिंग आणि इतर औद्योगिक उपयोगांसाठी.
  •         टाटा मोटर्स जेनसेट्स: इंटेलिजेंट रिमोट मॉनिटरिंग सिस्टमसह सीपीसीबी IV+ मानकांशी सुसंगत – १० केव्हीए ते १२५ केव्हीए श्रेणी.
  •         एचआर २१० लाइव्ह ॲक्सल: भारताचा पहिला हब रिडक्शन ॲक्सल; उच्च स्थानिक घटकांसह (लोकलाइज्ड कंटेंट) संपूर्ण स्वदेशी डिझाइन; आव्हानात्मक बांधकाम परिस्थितीत विश्वासार्ह कामकाजासाठी निर्मित.

टाटा मोटर्सचे ॲग्रिगेट्स त्यांच्या उच्च टिकाऊपणा, कार्यक्षमता आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखले जातात. इंडस्ट्रियल इंजिन श्रेणी भारतामधील बांधकाम क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण बदलत्या आणि उच्च-भार (हाय-लोड) ड्युटी सायकल्समध्ये सर्वोत्तम कामगिरी देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे; तर जेनसेट लाइनअपमध्ये रिअल-टाइम डायग्नोस्टिक ट्रॅकिंग आणि रिमोट कॉस्ट ऑप्टिमायझेशनसाठी इंटेलिजेंट रिमोट मॉनिटरिंग सिस्टम्स (५५ किलोवॅटपेक्षा कमी क्षमतेच्या व्हेरिएंट्ससाठी पर्यायी) पूर्णपणे एकीकृत करण्यात आल्या आहेत. हे जेनसेट्स टाटा मोटर्सच्या सिद्ध झालेल्या वेईक्युलर इंजिन प्लॅटफॉर्म्सद्वारे चालवले जातात, ज्यामुळे रस्त्यावर प्रत्यक्ष चाचणी घेतलेली विश्वासार्हता स्थिर वीज निर्मितीच्या उपयोगांमध्ये (स्टेशनरी पॉवर ॲप्लिकेशन्स) उपलब्ध होते.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now