अर्थसंकल्प २०२५ – मध्यमवर्गाला दिलासा, पर्यटन विकास आणि खाद्य प्रक्रिया क्षेत्रासाठी हुकलेल्या संधी

केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मधील वार्षिक १२ लाख रुपये उत्पन्नापर्यंत प्राप्तिकर न आकारण्याच्या तरतुदीमुळे मध्यमवर्गाला लक्षणीय दिलासा मिळाला असून त्यामुळे खर्च करण्याजोग्या उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक घडामोडींना उत्तेजन मिळेल. गौतम बुद्धांच्या जीवनाशी निगडीत पर्यटन स्थळांच्या विकासावरील भर हे रोजगार निर्मितीसाठीचे तसेच भारताला शांती व सांस्कृतिक वारसा चे जागतिक केंद्र बनवण्याप्रतीचे स्वागतार्ह पाऊल आहे.

कृषी, सूक्ष्म तथा लघु व मध्यम उद्योग, पायाभूत सुविधा आणि मध्यमवर्गाचे कल्याण यावर दिलेला भर प्रमुख विकास क्षेत्रांच्या उद्दिष्टांची पूर्तता करेल. मात्र खाद्य प्रक्रिया आणि बेकरी क्षेत्रासाठी वस्तू आणि सेवा करात (जीएसटी) सवलत आणि कर्जपुरवठा गरजेचा होता, ज्या संधी हुकल्या आहेत. अर्थात त्यांचा परतावा पगारदार व्यक्तींचा प्राप्तिकर कमी केल्याने ग्राहकांचा खरेदीवर खर्च वाढण्यातून मिळेल, अशी आशा आहे.

सचिन मालपाणी, व्यवस्थापकीय संचालक, मालपाणीज् बेकलाईट , पुणे