जमिनीच्या वादातून महिलेने राहत्या घरात गळफास लावून केली आत्महत्या, वडिलोपार्जित वाद आला समोर !

पुणे प्रहार डेस्क – वडिलोपार्जित जमिनीमुळे आतापर्यंत अनेक वादविवादापर्यंत पोहोचणाऱ्या घटना घडलेल्या आहेत. वडिलांची संपत्ती याचे वाटप होताना भाऊ-बहीण यांच्यात वाद देखील होत असतात परंतु अनेकदा या घटना आत्महत्या पर्यंत देखील पोहोचत असतात , अशीच घटना तळेगाव ढमढेर येथील सणसवाडी येथे घडलेली आहे.

घडलेल्या प्रकारामुळे आजूबाजूला खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे. सणसवाडी येथे राहणाऱ्या महिलेला वडिलोपार्जित जमिनीच्या हक्क सोड पत्रा नंतर मिळणारे पैसे मागण्यासाठी पतीने केलेला छळ या छळायला कंटाळून एका विवाहित महिलेने शेवटी गळफास लावून आपले जीवन संपविले आहे

ही घटना 13 जानेवारी सोमवारी महिलेच्या राहत्या घरी घडलेली आहे.

छाया विधाटे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. घडलेल्या घटनेवर करणे मयत विवाहित महिलेच्या बहिणीने म्हणजेच जया गवळी यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात पतविरोधात तक्रार नोंदवलेले आहे. या महिलेच्या पतीचे नाव विजय विधाटे आहे. या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे

सणसवाडी इथे राहणाऱ्या छाया यांच्या वडिलांनी काही दिवसापूर्वीच वडिलोपार्जित संपत्ती मधील हक्क सोडपत्र बनवून घेतले होते. या हक्क सोड पत्रानुसार महिलेला काही रक्कम देखील मिळणार होती परंतु वडिलांकडून मिळणारी रक्कम मिळावी याकरिता छाया च्या पतीने तिचा छळ करायला सुरुवात केली होती. त्याचबरोबर पैसे मागण्याचा धास व शारीरिक स्थळ मानसिक छळ यामुळे वैतागलेल्या छाया ने शेवटी राहत्या घरामध्येच गळफास लावून आत्महत्या केली. त्याचबरोबर पती विजय या महिलेला वारंवार वडिलांकडून हक्क सोड चे पैसे आणायला सांगत होता.

दमदाटी, छळ वेगवेगळ्या प्रकारची मारहाण तो करायचा म्हणूनच वैतागून महिलेने पाऊल उचलले असे देखील तक्रारदार छाया यांच्या बहिणीने तक्रारीत नोंदवताना सांगितले. पोलीस या घटना प्रकरणी तपास करीत आहेत आणि या घटने प्रकरणी पोलिसांनी छायाच्या पतीला अटक देखील केलेली आहे.