भारताचा क्रमांक एकचा ट्रॅक्टर निर्यात ब्रँड असलेल्या सोनालिका ट्रॅक्टरने २०२४ च्या आपल्या प्रवासाचा शेवट एका अचंबित करणाऱ्या कामगिरीने केला आहे. कंपनीने आपली आजपर्यंतची सर्वोच्च एकंदर बाजारपेठेतील वाट्याची १८ टक्के एवढी नोंद करून एक नवीन मापदंड निर्माण केला आहे. कंपनीने विकलेल्या एकंदर १,०,६३९ ट्रॅक्टरच्या असामान्य विक्रीमुळे ही जबरदस्त कामगिरी करणे शक्य झाले आहे.
डिसेंबर २०२३ मध्ये विकलेल्या ७,९९९ ट्रॅक्टरच्या तुलनेत ही ३३ टक्के एवढी जबरदस्त वाढ असून उद्योगाच्या वाढीपेक्षा ही अंदाजे २.४ पट अधिक आहे. सोनालिकाने एप्रिल ते डिसेंबर २०२४ या काळात १,१९, ३६९ एवढ्या वार्षिक ट्रॅक्टर विक्रीची नोंद करून आर्थिक वर्ष २०२५ मध्ये आपली सुसाट वाटचाल सुरू ठेवली आहे. यातून नाविन्यतेला चालना देणे आणि प्रत्येक शेतकऱ्याला कस्टमाईज्ड हेवी ड्युटी ट्रॅक्टर सोल्यूशन उपलब्ध करून देण्याची सोनालिकाची कटिबद्धता अधोरेखित होते.
शेती पद्धतीच्या आधुनिकीकरणावर अखंडित लक्ष केंद्रित करून आणि १५० पेक्षा अधिक देशातील शेतकऱ्यांना समर्थ करून कंपनीने ट्रॅक्टर उद्योगातील उत्कृष्ट त्याच्या कक्षा सातत्याने रुंदावल्या आहेत. शेतकऱ्यांच्या पीक आणि मातीच्या गरजांनुसार हेवी ड्युटी ट्रॅक्टरच्या पोर्टफोलिओचा विस्तार करण्यापासून ते आपले सेवा नेटवर्क समृद्ध करणे तसेच ग्राहकांच्या शक्य तेवढे निकट राहणे, यातून शेतीतून समृद्धीच्या प्रवासात एक विश्वासार्ह भागीदार म्हणून सोनालिकाने सातत्याने आपले स्थान निर्माण केले आहे.
या अभूतपूर्व कामगिरीबद्दल आपले विचार व्यक्त करताना इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक श्री. रमण मित्तल म्हणाले, प्रत्येक ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतकरी समुदायासाठी वाढ, चिकाटी आणि आशा यांच्या बीजांचे रोपण करण्याच्या आमच्या कटिबध्दतेला आम्ही बळ देतो.
या उत्साहजनक प्रवासापेक्षाही शेतकऱ्यांना अधिक उज्वल आणि अधिक समृद्ध भविष्याकडे नेण्याचे नेतृत्व करणे यात आमचा खरा आनंद आहे. हेवी ड्युटी ट्रॅक्टरच्या दमदार पोर्टफोलिओसह आम्ही २०२५ या नवीन वर्षात प्रत्येक संधीचा लाभ घेण्यास सज्ज आहोत. तसेच शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करून शेतीतून समृद्धी आणण्यासाठी कटिबद्ध आहोत.