पुण्यातील प्राइम घरांच्या किंमतीत 2024 मध्ये 16% वाढ, लक्झरी घरांच्या मागणीमुळे वाढीस चालना

By: Editor_Pratik

On: Wednesday, January 29, 2025 2:13 PM

लक्झरी
Google News
Follow Us

गेल्या वर्षात पुण्याच्या निवासी मालमत्ता बाजारपेठेत मालमत्तेच्या सरासरी मूल्यात 16% इतकी लक्षणीय वाढ झाली आहे, ज्याचे कारण, PropTiger.com यांच्या एका नवीन रिपोर्टनुसार, बांधकामाचे साहित्य आणि मजुरी यांच्या वाढत्या किंमतींच्या पार्श्वभूमीवर लक्झरी घरांची सतत वाढती मागणी हे आहे. रिअल इनसाइट: रेसिडेन्शियल अॅन्युअल राऊंडअप 2024 या अलीकडच्या रिपोर्टमध्ये असे निदर्शनास आले आहे की, 2024 च्या ऑक्टोबर-डिसेंबर या कालावधीत पुण्यासहित देशातील मोठ्या शहरांतील मालमत्तेच्या किंमती वाढण्याचा ट्रेंड चालू राहिला आहे, ज्यामधून दर्जेदार घरांची वाढती मागणी प्रतिबिंबित होते.

PropTiger.com च्या ‘रिअल इनसाइट: रेसिडेन्शियल अॅन्युअल राऊंडअप 2024’ नामक रिपोर्टनुसार, 2024 च्या ऑक्टोबर-डिसेंबर या कालावधीत विविध शहरांतील मालमत्तेच्या किंमती वेगवेगळ्या प्रमाणात वाढल्या आहेत. हैदराबाद या दक्षिण भारतीय निवासी मार्केटमध्ये जवळजवळ मागील दशकभर किंमती जबरदस्त वाढत होत्या. ही वाढ आता मंदावली आहे, पण विश्लेषणासाठी विचारात घेतलेल्या इतर सर्व शहरांत वार्षिक वाढ दुहेरी अंकात झाल्याचे दिसून येत आहे.

किंमतींचा ट्रेंड

शहर Q4 23 Q4 24 YoY
अहमदाबाद 4,000 4,402 10%
बंगळूर 6,744 7,536 12%
चेन्नई 6,200 7,173 16%
दिल्ली NCR 5,445 8,105 49%
हैदराबाद 6,842 7,053 3%
कोलकाता 5,100 5,633 10%
MMR 10,712 12,600 18%
पुणे 6,140 7,108 16%

स्रोत: : रिअल इनसाइट रेसिडेन्शियल: अॅन्युअल राऊंडअप 2024, हाऊसिंग रिसर्च

प्रस्तुत विश्लेषणात जी हाऊसिंग मार्केट समाविष्ट करण्यात आली आहेत, ती आहेत- अहमदाबाद, बंगळूर, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, दिल्ली-NCR (गुरुग्राम, नोयडा, ग्रेटर नोयडा, गाझियाबाद आणि फरीदाबाद), मुंबई महानगर प्रदेश (मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे) आणि पुणे.

या कंपनीने एका स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे, “दिल्ली NCR (या प्रदेशात अलीकडेच सूचीबद्ध झालेली 10 पेक्षा अधिक स्टार्ट-अप्स आहेत) मध्ये पैसे गुंतवणाऱ्या उच्च नेटवर्थ असलेल्या व्यक्तींनी या प्रतिष्ठित निवासी बाजाराची विकासाची गती निरंतर ठेवली आहे, कारण विकासक किफायतशीर घरांच्या तुलनेत प्रीमियम ऑफरिंग्जना प्राधान्य देत आहेत. याच एका कारणामुळे, देशभरात घरांच्या विक्रीत YoY 26% वार्षिक घट आली असूनही गुरुग्राम (YoY 144% वाढ), ग्रेटर नोयडा (YoY 54% वाढ) आणि नोयडा (YoY 3% वाढ) यांसारख्या मुख्य मार्केट्समध्ये घरांच्या विक्रीत वाढ झाली आहे.”

या रिपोर्टनुसार, भारताची आर्थिक राजधानी मुंबईत मालमत्तेच्या किंमती सरासरी YoY 18% ने वाढण्यामागचे घटक देखील असेच काहीसे आहेत. या रिपोर्टमध्ये पुढे असेही म्हटले आहे की, मोठमोठे व्यावसायिक, बॉलीवूड अभिनेते आणि क्रीडापटू मुंबईत राहात असल्यामुळे जगातील सर्वाधिक लोकवस्तीच्या या देशात मुंबई ही सर्वात महागडी निवासी बाजारपेठ आहे.

Housing.com आणि Proptiger.com चे ग्रुप CEO श्री. ध्रुव अग्रवाल म्हणाले, “यात शंकाच नाही की, अशा प्रकारच्या वाढत्या किंमती वाढती मागणी, विकासाची शक्यता आणि खरेदीदारांच्या सकारात्मक वृत्तीच्या निदर्शक आहेत. परंतु, अधिक किंमतींच्या दबावामुळे किफायतशीरतेच्या समस्या आणखी वाढू शकतात. कारण आपला देश असा आहे, जेथे बहुतांशी लोक घर खरेदी करताना सरकारी सब्सिडींवर अवलंबून असतात. वाढती महागाई आणि मंदावलेली वाढ यांच्या पार्श्वभूमीवर किफायतशीर घरांना प्रोत्साहन देण्यासाठी या बाबीची काळजी घेणारे धोरणात्मक उपाय सरकारने सुरू केले पाहिजेत. यंदाच्या अर्थसंकल्पात कर कायद्यात सकारात्मक बदल आणि रिझर्व बँकेने व्याजदरात कपात केल्यास देशातील मोठ्या मध्यमवर्गासाठी किफायतशीरता सुनिश्चित होण्यास मदत होऊ शकते.”

टीप: प्रस्तुत अहवालात जी हाऊसिंग मार्केट समाविष्ट करण्यात आली आहेत, ती आहेत- अहमदाबाद, बंगळूर, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, दिल्ली-NCR (गुरुग्राम, नोयडा, ग्रेटर नोयडा, गाझियाबाद आणि फरीदाबाद), MMR (मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे) आणि पुणे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026