पोल्ट्री फार्म जळून खाक; व्यावसायिकाचे सुमारे 4 कोटींचे नुकसान, आली भिक मागण्याची वेळ!

By: Editor_Pratik

On: Thursday, January 30, 2025 7:54 AM

जळून खाक
Google News
Follow Us

पुणे प्रहार डेस्क – सहजपूर तालुका हवेली येथे भीषण आग लागल्याची घटना घडलेली आहे. सहजपूर येथे किरण पोल्ट्री अँड ब्रीडिंग फार्म प्रायव्हेट लिमिटेड या नावाची कंपनी आहे. या कंपनीला रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली. ही आग इतकी भयंकर होती, की संपूर्ण पोल्ट्री फार्म जळून खाक झाला. या घटनेमुळे व्यवसायिकाचे सुमारे चार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

सुदैवाने या आगीच्या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. घडलेल्या प्रकार दुदैवी असला तरी सुदैवाने कुणाला काही झाले नाही. या घटने संदर्भात पोलिस अधिकारी तपास करीत आहेत.

नभाजी प्रल्हाद काळभोर (वय-52, रा. लोणी काळभोर, ता. हवेली) असे आगीत नुकसान झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, नभाजी काळभोर यांची किरण पोल्ट्री अँड ब्रीडिंग फार्म प्रायव्हेट नावाची कंपनी आहे. ही कंपनी अंडी उबवून पिल्ले तयार करते. या कंपनीला रविवारी दिनांक 26 जानेवारी रोजी दहा वाजता शॉर्टसर्किटमुळे आग लागली, अशी प्रथमदर्शनी माहिती मिळाली. या आगीमध्ये फायबर व प्लाय ने घेतल्याने मोठ्या प्रमाणात आग पसरली.

आग काही सेकंदातच मोठ्या प्रमाणावर पसरली यामुळे संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. या आगीत कंपनीतील सुमारे तीन कोटी रुपयांचे नुकसान झालेल्या असून या आगीत आठ लाख रुपयांची हेंचिंग अंडी, अंडी उबवण्याचे यंत्र, शेड ट्रोली ट्रेन व अन्य साहित्य सामग्री देखील जळून खाक झालेली आहे. पोलीस या घटनेचा पंचनामा करत आहेत व त्याचबरोबर आग लागण्याचे अन्य काही कारण आहे का? हे देखील तपासण्याचे काम करत आहेत.

मशीन गरम झाल्यामुळे आग लागल्याची माहिती प्रथम दर्शनी अहवालामध्ये समोर येत आहे त्याचबरोबर शासनाने घडलेल्या या घटनेची दखल घेऊन योग्य तो नुकसान भरपाई देखील द्यावी अशी मागणी व्यवसायिकाने केलेली आहे. जेणेकरून पुन्हा नव्याने व्यवसाय उभा करण्यासाठी मदत होईल, अशी आशा देखील या व्यावसायिकाने व्यक्त केलेली आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026